AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येकाकडून 500 रुपये चंदा घेऊन बनवला चित्रपट, प्रदर्शित होताच ठरला फ्लॉप, पण नंतर ठरला कल्ट क्लासिक

500-500 रुपयांचा चंदा गोळा करून बनवला होता हा चित्रपट, बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच ठरला फ्लॉप, पण नंतर बनला ‘कल्ट’ चित्रपट. तुम्ही पाहिला का?

प्रत्येकाकडून 500 रुपये चंदा घेऊन बनवला चित्रपट, प्रदर्शित होताच ठरला फ्लॉप, पण नंतर ठरला कल्ट क्लासिक
Ab Aayega Maza
| Updated on: Sep 28, 2026 | 8:48 PM
Share

सध्या बॉलिवूड आणि हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मोठ्या बजेटचे चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. तसेच अनेक प्रचंड मोठे बजेट असणारे चित्रपट तयार देखील होताना दिसत आहे. अनेकदा चित्रपट बनवताना कलाकार, बजेट आणि निर्मिती अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र काही चित्रपटांची निर्मितीची कहाणीच इतकी अनोखी असते की, ती चित्रपटापेक्षाही जास्त चर्चेत राहते. अशीच एक रंजक कहाणी आहे ‘अब आएगा मजा’ या 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या कॉमेडी चित्रपटाची.

500-500 रुपयांचा चंदा गोळा करून बनला चित्रपट

दिग्गज अभिनेते फारुख शेख यांच्या या चित्रपटासाठी मोठ्या निर्मात्यांकडून कोट्यवधींचं बजेट उभं करण्यात आलं नव्हतं. उलट, चित्रपटाच्या निर्मितीसाठी टीममधील सदस्यांनी 500-500 रुपये जमा करून चंदा गोळा केला आणि त्यातून हा चित्रपट तयार करण्यात आला.

गीतकार समीर अंजान यांनी नुकतेच शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये या चित्रपटाच्या निर्मितीमागची ही रंजक माहिती सांगितली. त्यांच्या माहितीनुसार, आलोक नाथ आणि गिरिजा शंकर यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली होती. प्रोडक्शन टीममधील सदस्यांनी आपल्या परीने प्रत्येकी 500 रुपयांचं योगदान दिलं आणि त्यातून चित्रपटाची निर्मिती करण्यात आली.

फारुख शेख यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार

‘अब आएगा मजा’मध्ये फारुख शेख आणि अनिता राज यांच्यासह रवी बसवानी, सतीश कौशिक, राजा बुंदेला आणि गिरिजा शंकर यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाचं दिग्दर्शन पंकज पराशर यांनी केलं होतं. पुढे त्यांनी ‘चालबाज’सारख्या लोकप्रिय चित्रपटांचं दिग्दर्शन केलं.

बॉक्स ऑफिसवर अपयशी, पण नंतर मिळाली वेगळी ओळख

प्रदर्शनाच्या वेळी ‘अब आएगा मजा’ला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नाही. व्यावसायिकदृष्ट्या हा चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र कालांतराने या चित्रपटाला ‘कल्ट कॉमेडी’ म्हणून ओळख मिळू लागली. विशेषतः कॉमेडी आवडणाऱ्या प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची वेगळीच लोकप्रियता निर्माण झाली.

अत्यंत कमी बजेटमध्ये आणि चंदा गोळा करून तयार झालेल्या या चित्रपटाची कहाणी आजही आश्चर्यचकित करणारी आहे. समीर अंजान यांच्या या खुलाशामुळे फारुख शेख यांच्या या जुन्या चित्रपटाच्या निर्मितीमागचा संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...