AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय हिच्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, पण अभिषेक बच्चन याने निभावलं जावयाचं कर्तव्य

Aishwarya Rai : एकीकडे पत्नी ऐश्वर्या राय हिच्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, तर दुसरीकडे अभिषेक याने निभावलं जावयाचं कर्तव्य, व्हिडीओ सर्वत्र व्हायरल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेक याच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा...

ऐश्वर्या राय हिच्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, पण अभिषेक बच्चन याने निभावलं जावयाचं कर्तव्य
| Updated on: Dec 16, 2023 | 11:52 AM
Share

मुंबई | 16 डिसेंबर 2023 : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र तुफान रंगत आहे. चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर फक्त आणि फक्त ऐश्वर्या आणि अभिषेक यांची चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये वाद सुरु आहेत. सासू जया बच्चन याच्यासोबत वाद सुरु असल्यामुळे ऐश्वर्या ‘जलसा’ बंगला सोडून आईसोबत राहात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, ऐश्वर्या हिच्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना अभिषेक बच्चन जावयाचं कर्तव्य निभावताना दिसला. सध्या ऐश्वर्या हिची आई आणि अभिषेक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ ऐश्वर्या – अभिषेक यांची लेक आराध्या बच्चन हिच्या एनुअल फंक्शनचा आहे. आराध्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल शिक्षण घेत आहे. नुकताच आराध्या हिचा एनुअल फंक्शन पार पाडला. यावेळी बच्चन कुटुंबियांसोबत ऐश्वर्या हिच्या आई वृंदा देखील उपस्थित होत्या.

समोर येत असलेल्या व्हिडीओमध्ये एनुअल फंक्शन संपल्यानंतर अभिषेक सासूबाईंना कारपर्यंत सोडण्यासाठी आला. सासूबाईंना कारमध्ये बसवल्यानंतर दुसऱ्या कारमधून ऐश्वर्या, अभिषेक आणि आराध्या त्यांच्या घरी गेले. अशा प्रकारे अभिषेक याने जावयाचं कर्तव्य निभावलं. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत आहेत.

ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं नातं

लेक आराध्या हिच्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक घटस्फोट घेत नसल्याच्या चर्चा समोर येत आहे. याआधी देखील अनेकदा ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा समोर आल्या आहेत. पण रंगणाऱ्या चर्चांवर अद्यावर आभिषेक आणि ऐश्वर्या यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही. कायम चाहत्यांना कपल गोल्स देणाऱ्या सेलिब्रिटींच्या घटस्फोटाची चर्चा समोर येत असल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. पण सत्य नक्की काय आहे.. समोर आलेलं नाही.

ऐश्वर्या अनेक ठिकाणी लेक आराध्या हिच्यासोबत पोहोचते. दोघींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. चाहते देखील दोघींच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. पण सध्या ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना