‘या’ अभिनेत्रीला अभिषेक बच्चन करतोय डेट, ऐश्वर्याला देणार घटस्फोट? चाहत्यांकडून संताप व्यक्त

Abhishek Bachchan Love Life: अभिषेक बच्चन याच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री, 'या' अभिनेत्रीला करतोय डेट, ऐश्वर्याला देणार घटस्फोट? 'त्या' व्हिडीओवर चाहत्याकडून संताप व्यक्त, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेक बच्चन याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

'या' अभिनेत्रीला अभिषेक बच्चन करतोय डेट, ऐश्वर्याला देणार घटस्फोट? चाहत्यांकडून संताप व्यक्त
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 1:58 PM

Abhishek Bachchan Love Life: गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यामध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. पण घटस्फोटाच्या चर्चांवर ऐश्वर्या – अभिषेक आणि त्यांच्या कुटुंबियांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. एवढंच नाहीतर, अनेक कार्यक्रमांमध्ये देखील ऐश्वर्या लेक आराध्या सोबत पोहोचते. तर अभिषेक सोबत पूर्ण बच्चन कुटुंब असतं. एकीकडे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे अभिषेकच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाल्याची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, अभिषेक बच्चन याच्या नावाची चर्चा सहअभिनेत्रीसोबत रंगत आहेत. अभिनेत्री आणि अभिषेक यांनी ‘दसवी’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. एवढंच नाही तर, चर्चा रंगल्यानंतर अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘लंचबॉक्स’ सारख्या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री निम्रत कौर आहे.

हे सुद्धा वाचा

निम्रत कौर हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये निम्रत कौर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. पापाराझी विरल भयानीने इन्स्टाग्रामवर निम्रत कौरचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दरम्यान, अभिषेक सोबत अफेअरची चर्चा रंगल्यामुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी अभिनेत्रीवर संताप व्यक्त केला आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने विचारलं, ‘निम्रत खरंच अभिषेकला डेट करत आहे?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘निम्रत बच्चन होण्याचा स्वप्न पाहात आहे?’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ऐश्वर्याचा संसार मोडला…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेकच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. अभिषेक बच्चन – निम्रत कौर यांच्या ‘दसवी’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात अभिनेत्रीने अभिषेकच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

दोघांच्या जोडीला चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं. काही रिपोर्ट्समध्ये, सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांच्या नात्याला सुरुवात झाली… असा देखील दावा केला जात आहे. पण यावर अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण सोशल मीडियावर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.
शिवसेनेतील मंत्रिपदासाठी इच्छुक अन् नाराजांसाठी एकनाथ शिंदेंचा तोडगा
शिवसेनेतील मंत्रिपदासाठी इच्छुक अन् नाराजांसाठी एकनाथ शिंदेंचा तोडगा.
'लाडक्या बहिणीं'नो डिसेंबरचा हप्ता हवाय? ही कागदपत्र तुम्ही जोडलीत का?
'लाडक्या बहिणीं'नो डिसेंबरचा हप्ता हवाय? ही कागदपत्र तुम्ही जोडलीत का?.
Bogus Medicines : बोगस गोळ्या-औषधांचा भांडाफोड, खरे मास्टरमाईंड कोण?
Bogus Medicines : बोगस गोळ्या-औषधांचा भांडाफोड, खरे मास्टरमाईंड कोण?.
पवारांवर टीका करताना पडळकर अन् खोतांची मारकडवाडीतून जहरी टीका
पवारांवर टीका करताना पडळकर अन् खोतांची मारकडवाडीतून जहरी टीका.
14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार,शिंदे-दादांच्या मंत्र्याची यादी दिल्लीत?
14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार,शिंदे-दादांच्या मंत्र्याची यादी दिल्लीत?.
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट.
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य.
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ.