आराध्याकडे फोन आहे का? यावर अभिषेकचे उत्तर ऐकून सर्वांनाच वाटलं कौतुक, तो म्हणाला, “ऐश्वर्यानं तिच्यासाठी…”
अभिषेक बच्चनला एका मुलाखतीत आराध्याकडे फोन आहे का? आणि ती सोशल मीडियावर आहे का? अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल अभिषेकला विचारण्यात आलं. त्यावर त्याने जे सांगितलं ते ऐकून सर्वांनाच कौतुक वाटलं. एवढंच नाही तर त्याने एश्वर्याबद्दलही काही गोष्टी सांगितल्या

सतत काहीना काही कारणांनी चर्चेत राहणारं कुंटुंब म्हणजे बच्चन कुटुंब. त्यात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच जास्त चर्चेत राहिले आहेत. पण कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये, लाल सिंदूर लावून जेव्हा ऐश्वर्याने आली तेव्हा तिने दिलेल्या एका संदेशासोबतचल तिच्या आणि अभिषेकमध्ये सर्व काही ठीक असल्याचे स्पष्ट केले. या अफवांनंतर, अभिषेकने त्याच्या कुटुंबाच्या परिस्थितीचे वेगळेच चित्र सादर केले आहे.
‘कालिधर लापता’ या चित्रपटातील अभिनेत्याने अलीकडेच एका मुलाखतीत त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्याबद्दल सांगितले. त्याने सांगितले की ऐश्वर्या रायने आराध्यचे आई म्हणून कसे संगोपन करत आहे किंवा तिच्याबद्दल तिने काही निर्णय तिने घेतले आहेत.
आराध्याच्या संगोपनाबद्दल काय म्हणाला अभिषेक
मुलाखतीत अभिषेक बच्चनने आराध्याच्या संगोपनाबद्दल सांगताना त्याचे पूर्ण श्रेय ऐश्वर्याला दिले. तो म्हणाला ‘मी प्रत्येक गोष्टीचे श्रेय तिच्या आईला देतो. मला पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि मी माझे चित्रपट बनवण्यासाठी बाहेर जातो पण ऐश्वर्या आराध्याची पूर्ण काळजी घेते.’
पत्नी ऐश्वर्याचे कौतुक करताना अभिषेक म्हणाला, ‘ती अद्भुत आहे. निस्वार्थी आहे. मी सर्व मातांसाठी हे सांगेन की वडील इतके देणारे नसतील, कदाचित आपण वेगळ्या पद्धतीने बनलेले असू. आपण बाहेर जातो, काम करतो, आपले ध्येय साध्य करण्यात व्यस्त असतो, परंतु आई आपल्या मुलांना पूर्ण प्राधान्य देते, हे एखाद्या आशीर्वादापेक्षा कमी नाही. कदाचित हेच कारण असेल की आपण कठीण काळात आपल्या आईंकडे प्रथम जातो.’
‘ऐश्वर्यानं आराध्यावर काही बंधने घातली आहेत’
अभिषेकने आराध्याच्या चांगल्या संगोपनाचे सर्व श्रेय ऐश्वर्याला दिले. अभिषेकने सांगितले की त्याची मुलगी आराध्या सोशल मीडियापासून दूर राहते आणि तिच्याकडे फोनही नाही. ऐश्वर्याने आराध्यासाठी या सर्व गोष्टींवर बंदी घातली आहे. तो म्हणाला, ‘ती एक समजूतदार मुलगी बनत आहे, ती स्वतःहून खूप काही शिकत आहे. ती स्वतःची ओळख निर्माण करत आहे आणि आम्हाला तिचा खूप अभिमान आहे. आराध्या ही आमच्या कुटुंबाचा आनंद आणि अभिमान आहे.’
View this post on Instagram
अभिषेकने सांगितले की आयुष्यासाठी सर्वात महत्वाचे काय आहे?
अभिषेक पुढे म्हणाला की, “दिवसाच्या शेवटी आनंदी आणि निरोगी कुटुंबात घरी येणे सर्वात आरामदायी असते. ही आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे.” अभिषेक बच्चनला आराध्याचा जन्म झाला तेव्हाचा तो सुंदर क्षणही आठवला. तो म्हणाला, ‘त्या वेळी ती इतकी लहान होती की ती माझ्या हातावर सहज बसू शकत होती. आता ती ऐश्वर्यापेक्षा उंच दिसते”
अफवांवरून राग व्यक्त करण्यात आला
‘कालिधर लपता’च्या प्रमोशन दरम्यान अभिषेकने ऐश्वर्यापासून वेगळे होण्याच्या अफवांवरही प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला की “अशा कथा सहजपणे रचल्या जाऊ शकतात, जे निराशाजनक आहे. तो म्हणाला की लोकांना वाईट गोष्टी लिहिणे खूप सोयीचे आहे, हे माहित नसतानाही ते एखाद्याला दुखवू शकतात.”
