‘या’ कारणासाठी अभिषेकची ‘ब्रीथ 2’ सीरिज जया बच्चन पाहणार नाही

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Nov 04, 2022 | 6:02 PM

जया बच्चन 'ब्रीथ 2' का पाहणार नाही? अभिषेकनेच केला खुलासा

'या' कारणासाठी अभिषेकची 'ब्रीथ 2' सीरिज जया बच्चन पाहणार नाही
Jaya Bachchan and Abhishek Bachchan
Image Credit source: Twitter

नवी दिल्ली- अभिनेता अभिषेक बच्चनच्या ‘ब्रीथ- इन्टू द शॅडो’ या वेब सीरिजचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 9 नोव्हेंबरपासून ही सीरिज ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रीम होणार आहे. या सीरिजच्या पहिल्या सिझनमध्ये अभिषेकने साकारलेल्या भूमिकेचं आणि त्याच्या अभिनयकौशल्याचं खूप कौतुक झालं होतं.

अभिषेकने नुकतीच ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2022’मध्ये हजेरी लावली. यावेळी तो ब्रीथच्या नव्या सिझनविषयी व्यक्त झाला. भाची नव्या नवेली नंदाला डार्क-थ्रिलर कथा पहायला आवडत असल्याचं त्याने सांगितलं. वडील अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेविषयी विचारलं असता ते नेहमीच माझ्या कामाची स्तुती करतात, असं तो म्हणाला.

विशेष म्हणजे आई जया बच्चन मात्र ही सीरिज पाहणार नसल्याचं त्याने सांगितलं. यामागचं कारण सांगताना अभिषेक म्हणाला, “आम्ही खूप चांगली थ्रिलर सीरिज बनवली आहे. याचा सर्वांत मोठा पुरावा म्हणजे माझी आई त्या सीरिजला पाहू इच्छित नाही. त्यांना अशा कथांची भिती वाटते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

“माझे कुटुंबीय आदल्या रात्रीपासूनच सीरिजची वाट पाहत असतील. मात्र माझी आई ती सीरिज पाहणार नाही. त्यांना अशा प्रकारची हिंसा, संतापाच्या भावना पहायला आवडत नाही. म्हणूनच त्या संसदेत निघून जातात, जिथे असं काही घडत नाही”, असं मजेशीर उत्तर अभिषेकने दिलं.

ब्रीथच्या पहिल्या सिझनप्रमाणेच या सिझनमध्येही अभिषेक बच्चनसोबत नित्या मेनन, सैय्यामी खेर आणि अमित साध महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. यात नवीन कस्तुरिया या कलाकाराची भर झाली. येत्या 9 नोव्हेंबर रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI