AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काम मिळेल की नाही..; अनेक वर्षांनंतर अभिषेक बच्चनने व्यक्त केली भीती

चित्रपटसृष्टीत 26 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अभिषेक बच्चन त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. करिअरच्या सुरुवातीला काम मिळेल की नाही, याबाबत मनात कायम असुरक्षिततेची भावना असायची, अशी कबुली त्याने दिली.

काम मिळेल की नाही..; अनेक वर्षांनंतर अभिषेक बच्चनने व्यक्त केली भीती
Abhishek BachchanImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 01, 2026 | 11:04 AM
Share

अभिषेक बच्चनने नुकतेच बॉलिवूड इंडस्ट्रीत 26 वर्षे पूर्ण केली आहेत. त्याचा पहिला ‘रेफ्युजी’ हा चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने करीना कपूरसोबत मुख्य भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेक त्याच्या या प्रवासाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. इतक्या वर्षांत अभिनेता म्हणून त्याचा आत्मविश्वास कसा वाढला, त्याच्यात कोणते बदल झाले, याविषयी त्याने सांगितलं.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक म्हणाला, “फक्त एकच बदल झाला आहे की आता मला अधिक सहज आणि आत्मविश्वास वाटतो. मला वाटतं की मी जेव्हा सुरुवात केली, तेव्हा मी थोडा अस्वस्थ होतो. पण आता मी कॅमेरासमोर अधिक सहजपणे वावरतो. जेव्हा तुम्ही जसे आहात तसे वागता आणि स्वत:मध्ये सहजपणा आणता, तेव्हा तुम्हाला घ्यायच्या निर्णयांबद्दल अधिक स्पष्टता येते. आज मी खूप स्पष्ट आहे किंवा असं म्हणायला हवं की गेल्या पाच ते सात वर्षांत काय करायचं नाही हे ठरवण्याच्या बाबतीत मी आता अधिक स्पष्ट झालोय. करिअरच्या सुरुवातीला काम मिळेल की नाही याबद्दल खूप अनिश्चितता असते. त्यामुळे तुमच्याकडे जे काही काम येतं, ते तुम्ही स्वीकारता.”

26 वर्षांच्या कारकिर्दीत अभिषेकने ‘गुरू’, ‘धूम’, ‘बंटी और बबली’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ‘ब्लफमास्टर’, ‘युवा’, ‘द बिग बुल’, ‘बॉब बिस्वास’, ‘टेन्थ’, ‘घुमर’, ‘आय वाँट टू टॉक’, ‘बी हॅपी’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या दमदार अभिनयाचं विशेष कौतुक झालं. अभिषेकला अनेकदा त्याच्या करिअरमुळे ट्रोलसुद्धा करण्यात येतं. अमिताभ बच्चन यांचा मुलगा असूनही इंडस्ट्रीत तेवढ्या ताकदीने आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात अभिषेक अपयशी ठरल्याचं अनेकांकडून म्हटलं जातं. एका पॉडकास्ट मुलाखतीत अभिषेकची बहीण श्वेता बच्चन हिने भावाच्या ट्रोलिंगविषयी राग व्यक्त केला होता. “माझं रक्त खवळतं”, अशा शब्दांत तिने प्रतिक्रिया दिली होती. अभिषेकची तुलना अमिताभ बच्चन यांच्याशी केली जाणं अजिबात पटत नसल्याचं तिने बोलून दाखवलं होतं.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ