AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन-तीन बायका आणि चार-पाच गर्लफ्रेंडनंतरही… मुनव्वर फारुकीचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल

बिग बाॅस 17 चा विजेता झाल्यापासून मुनव्वर फारुकी हा तूफान चर्चेत आहे. मुनव्वर फारुकी हा बिग बाॅसच्या घरातून बाहेर आल्यापासून धमाका करताना दिसतोय. मुंबईमध्ये तर एकप्रकारे शक्तीप्रदर्शनच करताना मुनव्वर फारुकी हा दिसला. मुनव्वर फारुकी हा बिग बाॅस 17 चा विजेता आहे.

दोन-तीन बायका आणि चार-पाच गर्लफ्रेंडनंतरही... मुनव्वर फारुकीचा 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
| Updated on: Feb 09, 2024 | 3:17 PM
Share

मुंबई : मुनव्वर फारुकी हा बिग बाॅस 17 चा विजेता झाल्यापासून सतत चर्चेत आहे. अनेक पार्ट्यांमध्ये धमाल करताना मुनव्वर फारूकी हा दिसतोय. मात्र, मुनव्वर फारूकी याच्यावर बिग बाॅसच्या घरात असताना अनेक गंभीर आरोप हे करण्यात आले. हेच नाही तर त्याची एक्स गर्लफ्रेंड आयशा खान ही बिग बाॅसच्या घरात दाखल झाली. मुनव्वर फारूकी हा एकाच वेळी दोन मुलींना डेट करत होता. हेच नाही तर बिग बाॅसच्या घरात येण्याच्या अगोदर एका मुलीला लग्नासाठी आॅफर देऊन आल्याचे देखील सांगितले गेले. पाच वर्षांचा मुलगा देखील मुनव्वर फारुकी याला आहे.

यावरूनच अनेकांनी मुनव्वर फारूकी याला टार्गेट करण्यास सुरूवात केली. आता तर चक्क अभिषेक मल्हान यानेच मुनव्वर फारूकी याची खिल्ली उडवली आहे. अभिषेक मल्हान याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये एक मुलगा दिसत आहे. आता हा व्हिडीओ तूफान चर्चेत असून लोक यावर मोठ्या कमेंट करताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे व्हॅलेंटाइन वीकवर हा व्हिडीओ अभिषेक मल्हान याने शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक माणूस येतो आणि अभिषेकला म्हणतो, इंस्टाग्रामवर 8 मिलियन, यूट्यूबवर 10 मिलियन फाॅलोवर्स आणि तरीही तुझ्याकडे बंदी आहे…यावर व्हिडीओमध्ये थेट अभिषेक मल्हान हा आपले दु:ख व्यक्त करत म्हणतो की…

देवाने माझ्यावर अजून असा हात ठेवला नाही की, मला 4 ते 5 गर्लफ्रेंड आणि 2 ते 3 बायका आणि मी एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये जाऊन शो जिंकू शकेल..आता हाच व्हिडीओ व्हायरल होतोय. नाव न घेता जबरदस्त टोमणे अभिषेक मल्हान याने मुनव्वर फारूकी याला मारल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

हेच नाही तर बिग बाॅस 17 च्या फिनालेच्या अगोदर अभिषेक मल्हान हा अभिषेक कुमार याला सपोर्ट करताना दिसला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत होता. मुनव्वर फारूकी याची लोक या व्हिडीओवर कमेंट करत खिल्ली उडवताना दिसत आहेत. या व्हिडीओनंतर मुनव्वर फारूकी याच्या चाहत्यांमध्येही संताप हा बघायला मिळतोय.

Follow Us
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
Video : गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
Video: पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ
Mumbai Ganpati Visarjan 2026 | लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ; गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी