AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिग बॉस 17’ संपताच सासऱ्यांचं अंकिताला फर्मान; नाराजीबद्दल अभिनेत्रीकडून खुलासा

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन ही जोडी बिग बॉसच्या सतराव्या सिझनमध्ये प्रचंड चर्चेत होती. शोच्या अनेक एपिसोड्समध्ये या दोघांना भांडताना पाहिलं गेलं. काहीवेळी ही भांडणं टोकाची झाली आणि घटस्फोटाचाही उल्लेख झाला. आता शो संपल्यानंतर अंकिताला तिच्या सासऱ्यांनी फर्मान जारी केलं आहे.

'बिग बॉस 17' संपताच सासऱ्यांचं अंकिताला फर्मान; नाराजीबद्दल अभिनेत्रीकडून खुलासा
अंकिता लोखंडे, विकी जैनImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 07, 2024 | 8:19 AM
Share

मुंबई: 7 फेब्रुवारी 2024 | ‘बिग बॉस 17’च्या घरात अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यात खूप भांडणं झाली. सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याचं वेगळं रुप पाहायला मिळत होतं, तर बिग बॉसमध्ये त्यांच्या नात्याची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांना पहायला मिळाली. हा शो संपल्यानंतर दोघं घटस्फोट घेणार की काय असा सवाल चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला होता. इतकंच नव्हे तर बिग बॉसच्या शोमध्ये जेव्हा अंकिताची सासू आली होती, तेव्हा त्यांनीसुद्धा तिला बरंवाईट सुनावलं होतं. आता शो संपला आहे. अंकिता आणि विकी दोघंही बिग बॉसच्या घराबाहेर आले आहेत. बाहेर आल्यानंतर दिलेल्या विविध मुलाखतींमध्ये त्यांनी आपली बाजू मांडली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिताने तिच्या सासऱ्यांविषयी सांगितलं आहे. बिग बॉसमधून बाहेर येताच अंकिताच्या सासऱ्यांनी दोघांसाठी फर्मान जारी केलंय.

अंकिता म्हणाली, “मी माझ्या सासऱ्यांशी फोनवर बोलले. आता मी बिलासपूरला जाऊन त्यांची भेट घेणार आहे. त्यांच्याशी फोनवर बोलले तेव्हा ते माझ्यावर आणि विकीवर संतापले होते. मात्र आता ते नाराज नाहीत. त्यांनी म्हटलंय की बिलासपूरला येऊन त्यावर बोलू.” बिग बॉसच्या घरात अंकिताने विकीच्या दिशेने चप्पल फेकली होती. त्यावरून तिचे सासू-सासरे खूप नाराज झाले होते. टीव्हीवर ही गोष्ट पाहताच अंकिताच्या सासऱ्यांनी तिच्या आईला फोन करून सुनावलं होतं. याविषयीची माहिती खुद्द तिच्या सासूने बिग बॉसच्या फॅमिली वीकदरम्यान येऊन अंकिताला सांगितलं होतं. “तुम्हीसुद्धा तुमच्या पतीला अशाप्रकारे चपलेनं मारायचे का”, असा सवाल अंकिताच्या सासऱ्यांनी तिच्या आईला केला होता.

या मुलाखतीत अंकिता तिच्या आणि विकीच्या भांडणावर सासूची प्रतिक्रिया काय होती याविषयीही व्यक्त झाली. “मम्मीने विकीला कधीच रडताना पाहिलं नव्हतं आणि जेव्हा त्याला त्यांनी रडताना पाहिलं तेव्हा त्या भावूक झाल्या होत्या. मम्मी पण माझ्यासारखीच आहे. मीसुद्धा त्यांच्या जागी असते, माझाही मुलगा असता तर मीसुद्धा भावूक झाले असते. माझ्या मुलासोबत असं का केलं, असा सवाल मीपण केला असता”, असं अंकिता म्हणाली.

‘बिग बॉस 17’च्या ग्रँड फिनालेच्या आधीच्या आठवड्यात विकी घराबाहेर पडला होता. शोमधून बाहेर येताच त्याने मैत्रिणींसोबत पार्टी केली होती. तर ग्रँड फिनालेमध्ये अंकिता चौथ्या स्थानी बाद झाली होती. बिग बॉसचा विजेता स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी ठरला. त्याला ट्रॉफी, 50 लाख रुपये आणि ह्युंडाई क्रेटा कार बक्षीस म्हणून मिळाली.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.