
मुंबई : मुनव्वर फारुकी हा बिग बाॅस 17 चा विजेता झाल्यापासून सतत चर्चेत आहे. अनेक पार्ट्यांमध्ये धमाल करताना मुनव्वर फारूकी हा दिसतोय. मात्र, मुनव्वर फारूकी याच्यावर बिग बाॅसच्या घरात असताना अनेक गंभीर आरोप हे करण्यात आले. हेच नाही तर त्याची एक्स गर्लफ्रेंड आयशा खान ही बिग बाॅसच्या घरात दाखल झाली. मुनव्वर फारूकी हा एकाच वेळी दोन मुलींना डेट करत होता. हेच नाही तर बिग बाॅसच्या घरात येण्याच्या अगोदर एका मुलीला लग्नासाठी आॅफर देऊन आल्याचे देखील सांगितले गेले. पाच वर्षांचा मुलगा देखील मुनव्वर फारुकी याला आहे.
यावरूनच अनेकांनी मुनव्वर फारूकी याला टार्गेट करण्यास सुरूवात केली. आता तर चक्क अभिषेक मल्हान यानेच मुनव्वर फारूकी याची खिल्ली उडवली आहे. अभिषेक मल्हान याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये एक मुलगा दिसत आहे. आता हा व्हिडीओ तूफान चर्चेत असून लोक यावर मोठ्या कमेंट करताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे व्हॅलेंटाइन वीकवर हा व्हिडीओ अभिषेक मल्हान याने शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक माणूस येतो आणि अभिषेकला म्हणतो, इंस्टाग्रामवर 8 मिलियन, यूट्यूबवर 10 मिलियन फाॅलोवर्स आणि तरीही तुझ्याकडे बंदी आहे…यावर व्हिडीओमध्ये थेट अभिषेक मल्हान हा आपले दु:ख व्यक्त करत म्हणतो की…
Did #AbhishekMalhan take a dig on #MunawarFaruqui for winning #BiggBoss17?? @AbhishekMalhan4 pic.twitter.com/auQqnPrKeN
— The Khabri (@TheKhabriTweets) February 8, 2024
देवाने माझ्यावर अजून असा हात ठेवला नाही की, मला 4 ते 5 गर्लफ्रेंड आणि 2 ते 3 बायका आणि मी एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये जाऊन शो जिंकू शकेल..आता हाच व्हिडीओ व्हायरल होतोय. नाव न घेता जबरदस्त टोमणे अभिषेक मल्हान याने मुनव्वर फारूकी याला मारल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.
हेच नाही तर बिग बाॅस 17 च्या फिनालेच्या अगोदर अभिषेक मल्हान हा अभिषेक कुमार याला सपोर्ट करताना दिसला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत होता. मुनव्वर फारूकी याची लोक या व्हिडीओवर कमेंट करत खिल्ली उडवताना दिसत आहेत. या व्हिडीओनंतर मुनव्वर फारूकी याच्या चाहत्यांमध्येही संताप हा बघायला मिळतोय.