तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे ब्रेकअप? तीन वर्षांचे नाते संपले, एकमेकांपासून…
Tejasswi Prakash and actor Karan Kundrra : गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे त्यांच्या नात्यामुळे जोरदार चर्चेत दिसत आहेत. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळतंय. सातत्याने यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

बिग बॉसच्या घरात अनेक नाते तयार होतात. मात्र, असे म्हणतात की, बिग बॉसच्या घरात तयार झालेले नाते फार काही काळ टिकत नाहीत. बऱ्याचवेळा बिग बॉसच्या घरात सतत एकसोबत राहणारे आणि आयुष्यभर एकमेकांची साथ देऊ बोलणारे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर एकमेकांची तोंड देखील बघत नाहीत. सध्या अशाच एका जोडीचे नाते चर्चेत आहे. तेजस्वी प्रकाश ही बिग बॉस 15 ची विजेता आहे. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात तिला तिचे प्रेम मिळाले. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची लव्हस्टोरी बिग बॉसच्या घरातच सुरू झाली.
विशेष म्हणजे बिग बॉसच्या घराच्या बाहेर पडल्यानंतरही दोघे धमाल करताना दिसले. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा सोशल मीडियावर फोटोही शेअर करताना दिसले. हेच नाही तर करण कुंद्रा याच्या आईसोबत मुंबईमध्ये फिरतानाही तेजस्वी प्रकाश ही दिसली. मात्र, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सांगितले जातंय.
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे ब्रेकअप झाल्याची जोरदार चर्चा आहे. दोघांमधील वाद इतके जास्त वाढले की, दोघांनी मिळून नाते थांबवण्याचा निर्णय घेतला. एक महिन्यांपूर्वीच दोघांचे ब्रेकअप झाले आहे. मात्र, दोघांनीही ब्रेकअपबद्दल काहीच भाष्य केले नाहीये, चाहत्यांना करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची जोडी प्रचंड आवडते.
बऱ्याचदा सेलिब्रिटी आपल्या ब्रेकअपची गोष्ट लपून ठेवतात. त्याचे काही कारणे देखील आहेत. यामुळेच करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे आपल्या ब्रेकअपबद्दल भाष्य करत नाहीत. करण कुंद्रा हा आपल्या आयुष्यात पुढे गेला असून त्याच्या सध्याच्या मालिकेतील एका अभिनेत्रीसोबत त्याचे अफेअर सुरू असल्याचे सांगितले जातंय.
तेजस्वी प्रकाश ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. तेजस्वी प्रकाश हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंगही बघायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना तेजस्वी प्रकाश कायमच दिसते.
