AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aishwarya Rai-Abhishek Bachchan : घटस्फोटाच्या चर्चा जोरात, तिकडे अभिषेक-ऐश्वर्याने मात्र… का होतेय चर्चा

अभिषेक-ऐश्वर्याचं 2007मध्ये लग्न झालं. पण त्या दोघांमध्ये काही ठीक नाही अशी अफवा अनेक महिन्यांपासून पसरली होती. या वर्षी जुलैमध्ये, अनंत अंबानींच्या लग्नात जेव्हा ऐश्वर्याने बच्चन कुटुंबासह नव्हे तर तिची मुलगी आराध्यासोबत हजेरी लावली होती. तेव्हापासून या चर्चांनी जोर धरला.

Aishwarya Rai-Abhishek Bachchan : घटस्फोटाच्या चर्चा जोरात, तिकडे अभिषेक-ऐश्वर्याने मात्र... का होतेय चर्चा
अभिषेक आणि ऐश्वर्याचे फोटो व्हायरल Image Credit source: instagram
| Updated on: Dec 06, 2024 | 12:13 PM
Share

गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमधील बहुचर्चित कपल ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यातील वादाच्या आणि घटस्फोटाच्या बातम्याची चर्चा सुरू आहे,अनेक अफवा पसरल्या आहेत. बऱ्याच समारंभांमध्ये, इव्हेंट्समध्ये ही जोडी वेगवेगळी दिसली. अनंत अंबानीच्या लग्नात तर संपूर्ण बच्चन कुटुंबासह अभिषेक आला होता, मात्र ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींनी वेगळी एंट्री केली. त्यानंतर केबीसीमध्ये अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या व्हिडीओतही त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या, पण त्यात ऐश्वर्या कुठेच नव्हती. एवढँच नव्हे तर प्रत्येकाच्या वाढदिवसाला सोशल मीडियावर आवर्जून शुभेच्छा देणारे अमिताभ तसेच अभिषेक या दोघांनी ऐश्वर्याच्या वाढदिवसाच्या दिवशी मात्र (1 नोव्हेंबर) तिला विशही केलं नाही.

या सगळ्यांमुळेच बच्चन कुटुंबातील वाद तसेच अभिषेक ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवांनी जोर धरू लागला. मात्र ऐश्वर्या किंवा अभिषेक दोघांपैकी कोणीच यावर आत्तापर्यंत प्रतिक्रिया दिलेली नाही. याचदरम्यान अभिषेक बच्चन याचं ‘दसवी’ चित्रपटाची को-स्टार निमरत कौर हिच्या सोबत नातं असल्याच्या अफवाही जोरात फिरू लागल्या. यामुळे एकच खळबळ माजली. मात्र आता सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनचे काही लेटेस्ट फोटो व्हायरल झाले असन त्यामध्ये हे जोडपं खूप खुश दिसतंय. त्यामुळे त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चांवर आता काही काळासाठी ब्रेक लागला आहे.

अभिषेक-ऐश्वर्याचे फोटो व्हायरल

फिल्म प्रोड्यूसर अनु रंजन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहेत. कारण त्या फोटोमध्ये अभिनेता अभिषेक बच्चन हा त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि सासूबाई वृंदा राय यांच्यासह हसतमुखाने पोझ करताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Anu Ranjan (@anuranjan1010)

पत्नीसह दिली पोज

याच पार्टीचे आणखी काही फोटो अभिनेत्री आएशा जुल्का हिनेही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. त्यामध्ये ती ऐश्वर्या आणि अभिषेकसोबत पोझ देताना दिसली. या पार्टीत ऐश्वर्याने चंदेरी वर्क असलेला काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. लाल रंगाची लिपस्टीक, मोकळे सोडलेले केस या लूकमध्ये ती अप्रतिम दिसत होती. तर अभिषेकनेही पत्नीसह ट्विनिंग करत काळ्या रंगाची शेरवानी घातली होती.

अभिषेक ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवा का ?

अभिषेक-ऐश्वर्याचं 2007मध्ये लग्न झालं. पण त्या दोघांमध्ये काही ठीक नाही अशी अफवा अनेक महिन्यांपासून पसरली होती. या वर्षी जुलैमध्ये, अनंत अंबानींच्या लग्नात जेव्हा ऐश्वर्याने बच्चन कुटुंबासह नव्हे तर तिची मुलगी आराध्यासोबत हजेरी लावली होती, तेव्हा अफवा पसरू लागल्या की या बॉलिवूड पॉवर कपलचे वैवाहिक जीवन चांगले चालले नाही. पण अलीकडेच एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये अभिषेक देखील त्याची मुलगी आराध्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये उपस्थित असल्याचे दिसले होते. पण आता त्यांचे पार्टीमधले फोटो समोर आल्याने त्यांच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे .

Follow Us
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र