AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल कपूर यांच्या आईचे निधन, कपूर कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांच्या ९० वर्षीय आई निर्मल कपूर यांचे निधन झाले आहे. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने कपूर कुटुंबासह संपूर्ण बॉलिवूड शोकग्रस्त झाले आहे. अनिल, बोनी आणि संजय कपूर यांना आईचे छत्र हरपले आहे.

अनिल कपूर यांच्या आईचे निधन, कपूर कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
| Updated on: May 02, 2025 | 7:18 PM
Share

प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर, चित्रपट निर्माते बोनी कपूर आणि अभिनेता संजय कपूर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनिल कपूर यांच्या मातोश्री निर्मल कपूर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे. निर्मल कपूर यांच्या निधनामुळे त्या तिघांच्या डोक्यावर आईचे छत्र हरपले आहे. कपूर कुटुंबासह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

निर्मल कपूर यांचे निधन आज २ मे २०२५ रोजी संध्याकाळी झाले. गेल्या आठवड्याभरापासून त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याबद्दल कुटुंबाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. मात्र, यामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

गेल्यावर्षी साजरा केलेला ९० वा वाढदिवस

निर्मल कपूर यांचा जन्म २७ सप्टेंबर रोजी झाला. गेल्यावर्षी २०२४ मध्ये त्यांनी त्यांचा ९० वा वाढदिवस थाटामाटात साजरा केला होता. त्यावेळी अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर आपल्या आईसोबतच्या खास आठवणींच्या फोटोंचे कोलाज शेअर केले होते. या फोटोंमध्ये अनिल कपूर यांच्यासोबत संजय आणि बोनी कपूरदेखील दिसत होते. यात संपूर्ण कुटुंब एकत्र खूप आनंदी दिसत होते.

या फोटोंमध्ये अनिल कपूर यांची पत्नी सुनीता कपूर या देखील सासूबाईंच्या बाजूला बसलेल्या दिसत होत्या. तसेच बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूर आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूरही दिसत होती.

वडिलांचे १४ वर्षांपूर्वी निधन

अनिल कपूर, बोनी कपूर आणि संजय कपूर यांच्या वडिलांचे निधन १४ वर्षांपूर्वी झाले होते. सुरिंदर कपूर हे त्यांचे वडील होते. ते प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. २०११ मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. १४ वर्षांपूर्वी त्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले होते.आता त्यांच्या मातोश्रींच्या निधनाने कपूर कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. सुरिंदर कपूर हे एकेकाळी कुटुंबासह पृथ्वीराज कपूरच्या गॅरेजमध्ये राहत होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी निर्मल कपूरही त्या गॅरेजमध्ये राहत होत्या. त्यांनी त्यांच्या मुलांचे योग्यरित्या संगोपन केले. आज त्यांची तिन्हीही मुलं बोनी, अनिल आणि संजय कपूर हे सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित व्यक्ती आहे. ते तिघेही बॉलिवूडमध्ये सक्रीय आहेत.

Follow Us
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण