धर्मेंद्र यांना नेमका कोणता आजार होता? त्याच्यावर मात करता येते का? जाणून घ्या!

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर आता बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. असे असताना आता त्यांना नेमका काय आजार होता? असे विचारले जात आहे.

धर्मेंद्र यांना नेमका कोणता आजार होता? त्याच्यावर मात करता येते का? जाणून घ्या!
dharmendra death and disease
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2025 | 5:44 PM

Dharmendra Death : दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. त्याच्या जाण्याने बॉलिवूड जगतात शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. धर्मेंद्र यांच्या जाण्याने सिनेसृष्टीची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, धर्मेंद्र यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. आता त्यांची प्राणज्योत मालवली आहे. असे असतानाच आता धर्मेंद्र यांना नेमका कोणता आजार होता? त्यांच्यावर काय उपचार सुरू होते? असे विचारले जात आहे.

काही दिवसांपूर्वी केले होते रुग्णालयात दाखल

काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार केल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली होती. निधनापूर्वी आयसीयूत उपचार सुरू होते. अगोदर धर्मेंद्र यांना नियमित तपासणी करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र चाचण्या केल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार करण्याची सूचना डॉक्टरांनी केली होती. ब्रिच कँडी रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांना सुरुवातीला श्वास घेण्यास अडचणी येत होत्या. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू होते. त्यांचा हार्टरेट 70 होता आणि रक्तदाब 140/80 असल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते. रुग्णालयात असताना धर्मेंद्र यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत होते. परंतु हे वृत्त तेव्हा धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनी फेटाळले होते. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

धर्मेंद्र यांना वाहिली आदरांजली

अलिकडच्या काळात धर्मेंद्र यांना सतत श्वास घेण्यास त्रास होत होता. याच वर्षाच्या एप्रिल महिन्यात धर्मेंद्र यांच्यावर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर ते कमी वेळात बरे झाले होते. मात्र वृद्धापकाळामुळे तसेच आजारी असल्याने धर्मेंद्र यांचे निधन झाले. दरम्यान, धर्मेंद्र यांचे निधन झाल्याचे वृत्त समजताच बॉलिवूडमधील कलाकारांनी विलेपार्ले येथील स्मशानभूमीत धाव घेतली. अनेक दिग्गज कलाकार त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत आहेत. या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनही धर्मेंद्र यांना आदरांजली वाहिली आहे.