
आपलं धमाल नृत्य, कॉमिक टायमिंगने आणि अभिनयाने रसिक प्रेक्षकांना भुरळ पाडणारा, हिरो नंबर 1 गोविंदा हा बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही, मात्र त्याचं वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत आहे. गेल्या काही काळापासून अशा बातम्या समोर येत आहेत की गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांच्यात सर्व आलबेल नाही आणि ते घटस्फोट घेणार होते, त्यानंतर त्यांच्या वकिलाने सांगितलं की त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दिला पण दोघांमध्ये सगळं ठीक आहे. त्यातच सुनिता अहुजा यांनी अनेक मुलाखतीत सांगितलं की ती गोविदांला डिव्होर्स देणार नाही. मात्र आता या सगळ्या बातम्यांदरम्यानच गोविदांचं वैयक्तिक आयुषय पुन्हा चर्चेत आलं आहे. त्याचं कारण म्हणजे सुनिता यांनी गोविदाला घटस्फोट देण्याचं ठरवलं असून त्यांनी याप्रकरणी कोर्टात अर्जही दाखल केल्याची बातमी समोर आली आहे.
दरम्यान, पत्नी सुनीता आहुजा हिच्याश घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान, अभिनेता गोविंदा काल रात्री पहिल्यांदाच विमानतळावर स्पॉट झाला. वैयक्तिक आयुष्यातील वादळानंतरही गोविंदा शांत दिसत होता आणि त्याने विमानतळावर पापाराझींशी नम्रपणे संवाद साधला.
गोविंदाचा बदलला लूक
एअरपोर्टवर गोविंदा दिसल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. पांढरी पँट, पांढरा टीशर्ट आणि पांढरचं जॅकेट घातलेल्या गोविंदा अतिशय शांत दिसत होता. डोळ्यांवर गॉगल, मिशी आणि खिशात हात घालून उभा असलेल्या गोविदांने फार काही तामझाम केला नव्हता. त्याचा हा बदललेला लूक बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ते पाहून नेटकरीही हैराण झालेत.
तो एअरपोर्टवर येताच कॅमेरामन्सनी गोविंदाभोवती गर्दी केली, ते पाहून अभिनेत्याने छायाचित्रकारांच्या दिशेने हात हलव अभवादन केलं, आणि त्यांच्या दिशेने फ्लाइंग किसही दिलं. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात सुरू असलेल्या वादळामुळे त्याच्या चेहऱ्यावर जराही वैताग किंवा अशांतता दिसली नाही.
गोविंदा आणि सुनीता आहूजाचा घटस्फोट
हॉऊटरफ्लायच्या वृत्तानुसार, सुनीता आहुजा यांनी गोविंदाविरुद्ध वांद्रे कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये त्यांनी हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत व्यभिचार, क्रूरता आणि परित्याग यांचा आरोप केला आहे.
डिसेंबर 2024 मध्ये ही याचिक दाखल केली होती. त्या याचिकेत असा दावा करण्यात आला होता की गोविंदा वारंवार सुनावणीला गैरहजर राहिला आहे आणि न्यायालयाने नियोजित केलेल्या समुपदेशन सत्रांनाही उपस्थित राहिला नाही. मात्र, सुनीता या प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहिल्या होत्या.
दरम्यान, अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत सुनीताने केवळ गोविंदाबद्दलच नाही तर त्याच्या आजूबाजूच्या लोकांबद्दलही तिची निराशा व्यक्त केली. द पॉवरफुल ह्युमन्सशी झालेल्या संभाषणात ती म्हणाली की, “आज त्याच्याकडे चार लोक आहेत – एक लेखक, एक संगीतकार, एक सचिव आणि एक वकील मित्र. त्यांचा काही उपयोग नाही. ते फक्त म्हणतात, ‘वाह, व्वा!’ जर त्याने संगीत बनवतं, तर ते ‘वाह, व्वा… अद्भुत आहे अस म्हणतात’ त्यांनी त्याला खरं सांगितले पाहिजे, अशा शब्दांत तिने खुशमस्कऱ्यांवर टीका केली. मी खरं बोलते तेव्हा तो नाराज होतो, असं तिने या संभाषणादरम्यान नमूद केलं.
व्लॉगमध्ये उघडली अनेक गुपितं
सुनीता आहुजा ही अलीकडेच त्यांच्या व्लॉगमध्ये, तिच्या लग्नाभोवती असलेल्या घटस्फोटाच्या अफवांबद्दल बोलली होती. या व्लॉगमध्ये ती एका मंदिरात जाताना दिसली, जिथे पुजाऱ्याशी बोलताना ती म्हणाली की ती लहानपणापासूनच महालक्ष्मी मंदिरात येत आहे. यावेळी ती बरीच रडलीदेखील. गोविंदा आणि सुनीता आहुजाचे लग्न 1987 साली झाले होते. घटस्फोटाची प्रक्रिया आणि पुन्हा समोर येणारे इंटरव्ह्यू यमुळे गोविंदा आणि सुनिता सतत चर्चेत असतात.