करण कुंद्राचे 18 वर्षांनी लहान मुलीसोबत अफेअर? तेजस्वी प्रकाश हिच्यासोबत अभिनेत्याने..

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची जोडी कायमच चर्चेत असते. करण आणि तेजस्वीची पहिली भेट ही बिग बाॅसच्या घरात झाली आणि दोघे पहिल्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, आता करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या नात्यामध्ये सर्वकाही ठिक नसल्याचे सांगितले जात आहे.

करण कुंद्राचे 18 वर्षांनी लहान मुलीसोबत अफेअर? तेजस्वी प्रकाश हिच्यासोबत अभिनेत्याने..
tejasswi prakash and karan kundrra
| Updated on: Jun 09, 2024 | 11:33 AM

टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. करण आणि तेजस्वीची पहिली भेट ही बिग बॉसच्या घरात झाली. त्यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. मध्यंतरी तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्या लग्नाची चर्चा होताना देखील दिसली. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे कायमच एकसोबत स्पॉट होताना दिसतात. करण कुंद्राने मोठा काळ मालिकांमध्ये गाजवला आहे. आता करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशच्या रिलेशनबद्दल मोठे अपडेट पुढे आले.

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्यात वाद सुरू असल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर आपल्यापेक्षा 18 वर्षाने लहान असलेला अभिनेत्रीच्या प्रेमात करण कुंद्रा हा पडल्याचे देखील सांगितले जातंय. यामुळेच तेजस्वी आणि करणमध्ये वाद सुरू आहे. मात्र, यावर अजूनही करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्याकडून काहीच भाष्य करण्यात नाही आले.

‘तेरे इश्क में घायाल’ या मालिकेत करण कुंद्रा आणि रीम शेख हे एकसोबत काम करत आहेत. रीम शेख हिच्यासोबतच करण कुंद्रा याचे नाव जोडले जात आहे. काही रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले की, रीम हिच्यामुळेच तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्यामध्ये वाद सुरू आहे. रीम शेखला करण कुंद्रा आवडत असल्याचाही दावा करण्यात आलाय.

तेरे इश्क में घायाल या मालिकेचे शूटिंग सुरू असताना करण आणि रीम शेखची जवळीक वाढली असल्याचे सांगितले जातंय. यामुळेच तेजस्वी प्रकाश ही बॉयफ्रेंड करण कुंद्रा याच्यावर नाराज आहे. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे चाहते KK चे व्हिडीओ शेअर करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या व्हिडीओला करण कुंद्रा हा लाईक करत नसल्याचे देखील सांगितले जात आहे.

रीम शेख आणि करण कुंद्रा यांच्यामध्ये तब्बल 18 वर्षाचे अंतर असल्याचे सांगितले जात आहे. करण कुंद्रा हा सध्या त्याच्या तेरे इश्क में घायाल या मालिकेत बिझी आहे. नागिन मालिकेत धमाकेदार भूमिका तेजस्वी प्रकाश हिने केलीये. तेजस्वी प्रकाश ही बिग बॉसची विजेता देखील आहे. तेजस्वी प्रकाश ही आज कोट्यवधीची मालकीन आहे. तेजस्वी प्रकाश हिने हिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.