आर. माधवन तरुणींसोबत फ्लर्ट करतो? ‘तो’ स्क्रीनशॉट व्हायरल होताच म्हणाला…
R. Madhavan Flirting With Young Girls: तरुणींसोबत फ्लर्ट करणं आर. माधवनला पडलं महागात... तरुणीसोबत चॅटचा 'तो' स्क्रीनशॉट व्हायरल होताच अभिनेता म्हणाला..., सध्या सर्वत्र फक्त अभिनेत्याने दिलेल्या स्पष्टीकरणाची चर्चा...

R. Madhavan Flirting With Young Girls: अभिनेता आर. माधवन याच्याबद्दल सोशल मीडियावर अनेक नको त्या चर्चा रंगल्या आहे. अनेकांनी तर अभिनेत्याच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केलत. वयाच्या 54 व्या वर्षी आर. माधवन तरुण मुलींसोबत फ्लर्ट करतो. सोशल मीडियाव काही स्क्रीनशॉट देखील व्हायरल झाले आहे. त्याला सोशल मीडियावर पाठवण्यात आलेल्या किस इमोजींना तो प्रतिसाद देत असल्याचाही दावा केला जात आहे. यावर अभिनेत्याने स्पष्टीकरण देखील सर्व चर्चांनी पूर्णविराम लावला आहे.
नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात आर. माधवन याने सतत होणाऱ्या टीकांवर स्पष्टीकरण दिलं आहे. चेन्नईमध्ये ‘पॅरेंट जिनी इंक ॲप’च्या लाँचिंग दरम्यान आर. माधवननं सोशल मीडियावर होणाऱ्या अनावश्यक चर्चेबद्दल भाष्य केलं. रेडिटवर अभिनेत्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
अभिनेता म्हणाला, ‘हे ॲप पालकांना सांगेल की, मुलं कधी सोशल मीडियाचा वापर करत आहेत. मी एक अभिनेता आहे. मल रोज हजारो मेसेज सोशल मीडियावर येत अशतात. एका तरुणीने मला एका मेसेज केला की, मी तुझा सिनेमा पाहिला आहे. सिनेमा मला प्रचंड आवडला. तू एक उत्तम अभिनेता आहेत… आणि त्यापुढे तिनं खूप सारे हार्ट आणि किस वाले इमोजी शेअर केले. ‘
‘जर एखादा चाहता, चाहती माझ्यासोबत इतक्या प्रेमाने बोलत असेल तर, मी त्यांना उत्तर दिलं पाहिजे. मी त्या मुलीचे आभार मानले आणि मेसेज केला. यानंतर तिने माझ्या उत्तराचा स्क्रिनशॉट इन्स्टाग्रामवर पोस्ट कोला.’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘आमच्यामध्ये काय बोलणं झालं ते लोकांनी पाहिलं नाही. त्यांना फक्त किसचे इमोजी दिसले. माझा हेतू फक्त तिच्या मेसेजला उत्तर द्यायचा होता. ही फार साधी गोष्ट आहे. पण लोकांमध्ये लगेच चर्चा सुरु झाली की, मॅडी तरुण मुलींसोबत चॅट करतो..’
‘आता माझ्या मनात एक भीती बसली आहे. सोशल मीडियावर कोणाला मेसेज करताना समोरचा किंवा इतर ते मेसेज कोणत्या दृष्टीने पाहतील सांगता येत नाही…’ असं देखील अभिनेता म्हणाला. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
