AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्याची आई 80 कोटींचा बंगला सोडून राहतेय झोपडीत, कारण ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याची आई जी 80 कोटींचा बंगला सोडून राहतेय एका मंदिरा शेजारील झोपडीत. मुलाच्या निधनानंतर नेमकं काय झालं?

प्रसिद्ध अभिनेत्याची आई 80 कोटींचा बंगला सोडून राहतेय झोपडीत, कारण ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 30, 2026 | 3:38 PM
Share

मुलं ही आई-वडिलांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू असतात. त्यांच्या प्रत्येक श्वासात मुलं असतात आणि पालक जिवंत असताना मुलांचा मृत्यू हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आघात मानला जातो. असाच एक हृदयद्रावक प्रसंग दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत घडला असून प्रसिद्ध अभिनेता डेनियल बालाजीच्या निधनानंतर त्याच्या आईची अवस्था अत्यंत वेदनादायक झाली आहे.

डेनियल बालाजीचे 2024 साली वयाच्या अवघ्या 48 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूने संपूर्ण चित्रपटसृष्टी तसेच त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या जाण्याने केवळ एक प्रतिभावान कलाकारच नाही तर कुटुंबाचा आधारस्तंभही हरपला.

दमदार अभिनयाची ओळख

डेनियल बालाजीने आपल्या कारकिर्दीत अनेक लक्षवेधी भूमिका साकारल्या. विशेषत नकारात्मक भूमिकांमध्ये त्याने आपली वेगळी छाप पाडली होती. वेट्टैयाडू विलैयाडू, पोल्लाधवन आणि वाडा चेन्नई यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपट निर्मात्यांसाठी तो खलनायकाच्या भूमिकेसाठी पहिली पसंती मानले जात.

डेनियल बालाजीने आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजनमधून केली. कमल हासन यांच्या ‘मरुथुनायकम’ या प्रकल्पाशीही तो जोडला गेला होता. जरी हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही तरी त्यातून त्याने मोठा अनुभव मिळाला. 2002 साली एप्रिल मथाथिल या चित्रपटातून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्याने प्रॉडक्शन मॅनेजर म्हणूनही काम केले होते. त्याला आध्यात्मिकतेचीही आवड होती आणि चेन्नईतील अवडी येथे त्याने एक मंदिर बांधले होते.

आईसाठी बांधलेला आलिशान बंगला

मिळालेल्या माहितीनुसार, डेनियल बालाजीने आपल्या आई राजलक्ष्मी यांच्यासाठी सुमारे 80 कोटी रुपये किमतीचा आलिशान बंगला बांधला होता. या बंगल्यात त्याची आई राहात होती. मात्र, मुलाच्या निधनानंतर या घरातील प्रत्येक कोपरा त्यांना त्याची आठवण करून देऊ लागला.

मुलाच्या आठवणींनी व्याकुळ झालेल्या त्याच्या आईने हा आलिशान बंगला सोडण्याचा निर्णय घेतला. आज त्या आपल्या मुलाने बांधलेल्या मंदिराजवळील एका छोट्या झोपडीत राहतात. हा निर्णय त्याच्या दुःखाची तीव्रता दर्शवतो. डेनियल बालाजीच्या मृत्यूनंतर त्याच्या आईची अवस्था पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. एका यशस्वी अभिनेत्याने आईसाठी उभारलेलं आलिशान घर, आणि त्याच आईने मुलाच्या आठवणींमुळे ते घर सोडून साधं जीवन स्वीकारणं. ही कथा प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी आहे.

Follow Us
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
घरात बसून पक्ष वाढत नाही तर...; गिरीष महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
घरात बसून पक्ष वाढत नाही तर...; गिरीष महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
शिंदे हे अमित शाहांचे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut UNCUT | शिंदे हे अमित शाहांचे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा हल्लाबोल