AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठ्या घडामोडी? रजनीकांत, कमल हसन, चिरंजीवी नव्हे, आता हा अभिनेता येणार राजकारणात; दक्षिणेत विजय थलपतींना तगडं आव्हान?

R Madhavan on Thalapathy Vijay : साऊथ सुपरस्टार थलपती विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासूनच फिल्म दुनियेत राजकारणाची चर्चा सुरू झाली. आता आणखी एक अभिनेता राजकारणात येण्याच्या अफवा उठत आहेत.

मोठ्या घडामोडी? रजनीकांत, कमल हसन, चिरंजीवी नव्हे, आता हा अभिनेता येणार राजकारणात; दक्षिणेत विजय थलपतींना तगडं आव्हान?
आता हा अभिनेताही राजकारणात येणार का ?
| Updated on: Aug 06, 2026 | 12:23 PM
Share

तमिळनाडूच्या राजकारणात नुकत्याच झालेल्या ऐतिहासिक सत्तांतरानंतर अभिनेता विजय (Thalapathy Vijay)  मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. चित्रपटसृष्टीतून थेट राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेल्या विजय यांच्या यशाची सर्वत्र चर्चा सुरू असताना, त्यांचा जवळचा मित्र आणि लोकप्रिय अभिनेता आर. माधवन (R Madhavan) यानेही पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे. विजय यांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करतानाच, माधवनने राजकारणाबाबत स्वतःची भूमिकाही स्पष्ट केली. ‘जीडीएन’ या आपल्या आगामी तमिळ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान माधवनने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याच्यासोबत दिग्दर्शक के. एस. रविकुमारही उपस्थित होते. चित्रपटाच्या चर्चेसोबतच तमिळनाडूच्या बदलत्या राजकीय परिस्थितीवरही दोघांनी भाष्य केले. राजकारणबद्दलचं माधवनचं मत वेगाने व्हायरल झालं.

विजय आता फक्त अभिनेता नव्हे, मुख्यमंत्री आहेत

विजय यांच्या यशाबद्दल बोलताना माधवन म्हणाला, “मी विजयला अनेक वर्षांपासून ओळखतो. आज तो फक्त माझा मित्र नाही, तर तमिळनाडूचा मुख्यमंत्री झाला आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ” “राज्यातील जनतेने बदल स्वीकारला आहे. नवीन नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. एका कलाकाराने इतक्या मोठ्या जबाबदारीपर्यंत पोहोचणं हा संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी प्रेरणादायी क्षण आहे” असं म्हणत त्याने कौतुकही केलं.

राजकारण ही दुधारी तलवार

राजकारणाबाबत आपलं मत मांडताना माधवन म्हणाला की, “राजकारणात तुम्ही कितीही चांगलं काम केलं, तरी टीका टाळता येत नाही. प्रत्येक निर्णयावर मतभेद होणारच. देशासाठी कितीही काम केलं तरी काही लोक कायम विरोधातच उभे राहतात. त्यामुळे राजकारण हे खरंच दुधारी तलवारीसारखं आहे” असं मत त्याने व्यक्त केलं.

राजकारणात प्रवेश करणार का माधवन ?

यावेळी दिग्दर्शक के. एस. रविकुमार यांनी मजेशीर अंदाजात माधवनला, “आता तुमचाही राजकारणात येण्याचा विचार आहे का?” असा प्रश्न विचारला. त्यावर माधवनने हसतच स्पष्ट उत्तर दिलं. “अजिबात नाही. माझा राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही,” असं त्याने लगेच सांगितलं.

सत्ता नको, माझं आयुष्य माझ्या अटींवर जगायचंय

राजकारणापासून दूर राहण्यामागचं कारण स्पष्ट करताना माधवन म्हणाला, ” राजकारणात यायचं असेल तर निःस्वार्थी सेवाभाव आवश्यक असतो. मला सत्तेची कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही. मला नेता किंवा मुख्यमंत्री बनायचं नाही. मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगणं पसंत करतो. समाजासाठी मदत करण्याचे इतरही अनेक मार्ग आहेत आणि मी त्याच मार्गाने पुढेही काम करत राहीन” असं माधवनने नमूद केलं. दरम्यान ‘जीडीएन’ हा माधवनचा आगामी चित्रपट 7 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.

Follow Us
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर