AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईच्या निधनानंतर अभिनेता राजीव खंडेलवालने सांगितला भावुक प्रसंग, म्हणाला “मी स्वतःला दोषी मानतो”

टीव्ही अभिनेता राजीव खंडेलवाल हा नेहमीच पडद्यावरील उपस्थितीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. मात्र नुकतेच एका टीव्ही शोमध्ये राजीव भावनिक झाला. आपल्या आईची आठवण् काढताना भावूक झाला.

आईच्या निधनानंतर अभिनेता राजीव खंडेलवालने सांगितला भावुक प्रसंग, म्हणाला मी स्वतःला दोषी मानतो
| Edited By: | Updated on: May 11, 2026 | 3:58 PM
Share

लोकप्रिय टीव्ही अभिनेता राजीव खंडेलवालने आपल्या अभिनयाने आणि शैलीने लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. टीव्हीवरील आपल्या कारकिर्दीत, राजीव खंडेलवाल ‘कहीं तो होगा’ आणि ‘लेफ्ट राईट लेफ्ट’ यांसारख्या अनेक सुपरहिट मालिकांमध्ये दिसला आहे. सध्या, राजीव खंडेलवाल ‘तुम हो ना’ या मालिकेत दिसत आहे. मालिकेच्या आगामी एका भागात, आपल्या दिवंगत आईच्या कॅन्सर संघर्षाबद्दल बोलताना कमालीचा भावूक झाला. त्याने सांगितले की, तो आजही स्वत:ला त्याच्या आईच्या मृत्यूसाठी गुन्हेगार समजतो. तर यावेळी अभिनेता राजीव खंडेलवालने चाहत्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.

‘तुम हो ना’ च्या आगामी भागात राजीव खंडेलवाल आपल्या आईच्या आजारपणाचे ते क्षण आठवताच भावूक झालेला दिसेल. तर त्याने आपल्या भावना या शो दरम्यान व्यक्त केल्या.

शोमध्ये आपले दुःख व्यक्त करताना राजीव खंडेलवाल म्हणाला की, “मी स्वतःला बऱ्याच अंशी दोषी मानतो, कारण मला माझ्या आईच्या आजाराची सुरूवातीची लक्षणे समजू शकली नाहीत. वाढत्या वयानुसार आईला आरोग्यासंबंधी हे त्रास होत असावेत असं मला वाटलं. पण ही माझी मोठी चुक होती. तर एकूणचा हा पश्चात्ताप राजीवला आजही अस्वस्थ करतो.

राजीवने देशातील महिलांना आवाहन केले

आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा दुर्लक्ष करत असलेल्या गर्भाशयाच्या कॅन्सरच्या लक्षणांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी त्या अभिनेत्याने या शोचा वापर केला. महिलांशी बोलताना त्याने हा एक खास संदेश दिला.

राजीव म्हणाला, “हा कार्यक्रम भारतातील सर्व महिलांना समर्पित आहे. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, जर तुमच्यापैकी कोणालाही पाठदुखी, भूक न लागणे आणि गॅस होणे यांसारखे त्रास दीर्घकाळ टिकून मराहत असतील, कृपया डॉक्टरकडे जाऊल स्वत:ची तपासणी करून घ्या.

राजीव पुढे म्हणाला, “गर्भाशयाचे कॅन्सर नियंत्रणात आणता येतो. मी माझ्या आईसाठी हे करू शकलो नाही, पण तुमच्या आजूबाजूच्या महिलांसाठी नक्कीच करू शकता. तुम्ही त्यांच्याबद्दल नक्कीच विचार करू शकता आणि लक्षणे समजून घेऊ शकता.”

आईच्या मृत्यूमुळे राजीव पूर्णपणे खचून गेला होता.

राजीव खंडेलवाल यांच्या आईचे 2018 साली गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या आईने सुमारे दीड वर्ष गर्भाशयाच्या कॅन्सरशी लढा दिला. त्यानंतर प्रदीर्घ आजारानंतर त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने राजीव पूर्णपणे खचून गेले होते.

Follow Us
धक्कादायक! बायकोमुळे मुरलीधरनं चक्क आई-वडिलांना... खवड्या डोंगरावरील
धक्कादायक! बायकोमुळे मुरलीधरनं चक्क आई-वडिलांना... खवड्या डोंगरावरील दुर्घटना प्रकरण वेगळ्याच वळणावर?
सीसीटीव्हीत... रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया; PAच्या 12 वर्षीय...
सीसीटीव्हीत... रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया; PAच्या 12 वर्षीय लेकीचा मृत्यू नेमका कशामुळे?
107 वर्ष जुन्या चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेश मंडळासोबत अदाणी ग्रुपचं...
107 वर्ष जुन्या चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेश मंडळासोबत अदाणी ग्रुपचं टायअप, यंदाचा गणेशोत्सव...
पुणे-सातारा महामार्ग रास्तारोको: सुप्रिया सुळेंचा आंदोलकांशी संवाद,
पुणे-सातारा महामार्ग रास्तारोको: सुप्रिया सुळेंचा आंदोलकांशी संवाद, प्रमुख तीन मागण्या काय?
मंत्र्याच्या जावयाला... भ्रष्टाचाराचं 'जामनेर पॅटर्न'; नाशिकसह महाराष्
मंत्र्याच्या जावयाला... भ्रष्टाचाराचं 'जामनेर पॅटर्न'; नाशिकसह महाराष्ट्रभरात... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
शिंदे गटाची इनकमिंग काही थांबेना! ठाकरे गटाला मोठा धक्का, धाराशिव...
शिंदे गटाची इनकमिंग काही थांबेना! ठाकरे गटाला दिला आणखी मोठा धक्का, धाराशिवच्या राजकारणात...
कुणालच्या घरी गरिबी नाही भरपूर पैसा, मात्र बापानं... अखेर कपरे भरवणारी
कुणालच्या घरी गरिबी नाही भरपूर पैसा, मात्र बापानं... अखेर थरकाप उडवणारी माहिती समोर
मोठी बातमी! रोहित पवारांच्या PA च्या लेकीचा संशयास्पद मृत्यू, आईशीच..
मोठी बातमी! रोहित पवारांच्या PA च्या लेकीचा संशयास्पद मृत्यू, आईशीच... हादरवणारी माहिती समोर
कुटुंबातील एकही व्यक्ती... कुणालच्या शेजाऱ्यांनीची चक्रावणारी माहिती
खवड्या डोंगर: कुटुंबातील एकही व्यक्ती... कुणालच्या शेजाऱ्यांनी दिली चक्रावणारी माहिती, अखेरच्या चार महिन्यांमध्ये...
मोठी बातमी! अभिजीत दीपकेंवर गंभीर गुन्हा दाखल, थेट शासकीय...
मोठी बातमी! अभिजीत दीपकेंवर गंभीर गुन्हा दाखल, थेट शासकीय... नेमकं काय घडलं?