
बॉलिवूडच्या झगमटाच्या दुनियेमागे एक काळ सत्य दडलेले असते. अनेक कलाकारांना अतिशय वाईट गोष्टींचा सामन करावा लागतो. नवख्या कलाकारांसोबत तर जे घडतं ते ऐकून अक्षरश: अंगावर काटा येतो. सध्या असाच एक अभिनेता चर्चेत आहे. या अभिनेत्यावर काही दिवसांपूर्वी बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. आता या अभिनेत्याविरोधात पोलिसांनी FIR दाखल केल्याचे समोर आले आहे. हा अभिनेता कोण आहे? त्याने नेमकं काय केलं आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी…
नेमकं प्रकरण काय?
आम्ही ज्या अभिनेत्याविषयी बोलत आहोत तो हरियाणवी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता उत्तर कुमार आहे. तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यांच्या अडचणी थांबण्याचे नावच घेत नाहीत. बलात्काराच्या प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या उत्तरवर आता आणखी एक गंभीर आरोप लावण्यात आला आहे. यावेळी एका वकीलाने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हा तोच वकील आहे ज्याने अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या मुलीची बाजू मांडली आहे.
उत्तर कुमार बराच काळापासून वादात आहेत. त्यांच्यावर आणखी एक आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या वकीलांचे म्हणणे आहे की उत्तर कुमारच्या बाजूने त्यांना धमक्या दिल्या जात आहेत आणि YouTube वर त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह व्हिडीओही पोस्ट केले जात आहेत.
केस सोडण्यासाठी दबाव टाकला जात आहे
हरियाणवी आणि देहाती चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेता उत्तर कुमारवर बलात्काराचे आरोप आहेत. सप्टेंबर महिन्यात न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायिक कोठडी सुनावली होती. मात्र नंतर ते जामिनावर बाहेर आले. आता याच प्रकरणानंतर त्याच्यावर आणखी एक FIR दाखल झाला आहे. ही तक्रार त्या वकीलाने केली आहे जी पीडितेची केस लढत होता. त्यांचा आरोप आहे की लोकांकडून त्याला धमक्या मिळवत आहेत. त्यांच्यावर केस सोडण्यासाठी दबाव टाकला जात आहे.
व्हिडीओ पोस्ट करून धमक्या दिल्या जात आहेत
वकीलांचे म्हणणे आहे की त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिला जात आहे आणि घाणेरड्या शिव्याही दिल्या जात आहेत. उत्तर कुमारने आपल्या एका सहकाऱ्याकडून YouTube वर एक आक्षेपार्ह आणि धमकीचा व्हिडीओ पोस्ट करुन घेतला आहे. वकीलांनी गाझियाबादच्या कविनगर पोलीस ठाण्यात याबाबत FIR दाखल केला आहे. त्यांनी सांगितले की त्या दुष्कर्म आणि SC-ST कायद्याच्या प्रकरणात पीडितेच्या बाजूने निकाल देत आहेत. ७ नोव्हेंबरला त्या पीडितेसोबत कोर्टात गेल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ८ नोव्हेंबरला सोनम सैन नावाच्या महिलाने YouTube वर एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात वकील आणि त्यांच्या ६ वर्षीय मुलींबाबत अत्यंत घाणेरड्या गोष्टी सांगितल्या आणि धमकावले गेले.
अभिनेत्यावर शालीमार गार्डनमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. खरे तर जून २०२५ मध्ये उत्तर कुमारविरोधात केस दाखल करण्यात आली होती. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत दुष्कर्म केल्याचा आरोप होता, त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्याला ताब्यात घेतले होते. ३० सप्टेंबरला त्याला डासना तुरुंगातून जामिनावर सोडण्यात आले होते.