अंत्ययात्रा न काढताच धर्मेंद्र यांचे अंत्यसंस्कार घाईत का केले? अखेर हेमा मालिनी यांनी सांगितलं खरं कारण

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी एक काळ बॉलिवूड चित्रपटांमध्य गाजवला. त्यांचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. मात्र, धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला आणि त्यांच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कार अत्यंत गुपचूपमध्ये गेले. हेच नाही तर धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराचा एक साधा फोटोही पुढे आला नाही. यावर पहिल्यांदाच हेमा मालिनी यांनी भाष्य केले.

अंत्ययात्रा न काढताच धर्मेंद्र यांचे अंत्यसंस्कार घाईत का केले? अखेर हेमा मालिनी यांनी सांगितलं खरं कारण
hema malini
Updated on: Dec 01, 2025 | 1:28 PM

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी मुंबईत निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी त्यांच्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यामुळे फक्त त्यांच्या कुटुंबालाच नाही तर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. धर्मेंद्र बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू होते. मध्यंतरी त्यांच्या निधनाची बातमी देखील पसरली. देओल कुटुंबियांकडून धर्मेंद्र यांची प्रार्थना सभा देखील ठेवण्यात आली. मात्र, या प्रार्थना सभेला हेमा मालिनी किंवा त्यांच्या दोन्ही मुली पोहोचल्या नव्हत्या. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांचे निधन झाले किंवा कुठे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार याबाबतची कोणतीही माहिती लोकांना देओल कुटुंबाकडून देण्यात आली नाही. यामुळे लोकांमध्ये मोठा संताप बघायला मिळाला.

धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल सर्वकाही गोष्टी इतक्या लपून का करण्यात आल्या, याबद्दल अखेर मोठा खुलासा करण्यात आला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर नुकताच, हमद अल रियामी यांनी हेमा मालिनी यांची भेट घेतली. त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल आणि त्यांच्या अंत्यसंस्कारबद्दल इतकी गुप्तता का पाळण्यात आली हे सांगितले आहे.

याबद्दलचा खुलासा स्वत: हेमा मालिनी यांनी त्यांच्यासोबत बोलताना केला. अरबी भाषेत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, धर्मेंद्र हे गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी मी दिवंगत सुपरस्टार धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी यांना भेटायला गेलो होतो. यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. हेमा मालिनींच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या, ज्या मला जाणवल्या. हेमा मालिनी यांनी हमद अल रेयानी यांना बोलताना सांगितले की, धर्मेंद्र यांनी पूर्ण आयुष्यभर याची काळजी घेतली की, त्यांना आजारी अवस्थेत कोणी बघू नये.

ते कायमच आपले दु:ख लपवत होते. हेच नाही तर अत्यंत जवळचा व्यक्ती गेल्यानंतरही त्यांनी आपले दु:ख कधी दिसू दिले नाही. शेवटी निर्णय कुटुंबावर असतो. यावेळी बोलताना हेमा मालिनी यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. पुढे हमदने लिहिले की, तो निर्णय ठिकच होता. हमीद तू त्यांची स्थिती बघू शकला नसताना असेही हेमा मालिनी यांनी म्हटले. पण जे काही असेल त्यांच्याबद्दलची माझे प्रेम कधीच कमी होणार नाही किंवा त्यांचा प्रभाव माझ्या आयुष्यावरील कमी होणार नाही.