2 लग्न, 6 मुले आणि 13 नातवंडे, असे धर्मेंद्र यांचे कुटुंबिय, अभिनेत्याने जीवनात…
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. धर्मेंद्र यांनी त्यांच्या करिअरमध्ये हीट चित्रपट बॉलिवूडला दिली. अत्यंत मोठा असा परिवार त्यांचा आहे.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत गंभीर आहे. मुंबईतील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कालपासून धर्मेंद्र यांची तब्येत खालावल्याची माहिती होती. अनेक बॉलिवूड कलाकार धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी रूग्णालयात दाखल होताना दिसले. घरातील जवळपास सदस्य कालपासून रूग्णालयातच होते. धर्मेंद्र यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या. धर्मेंद्र यांचे खासगी आयुष्यही तितकेच चर्चेत राहिले आहे. धर्मेंद्र यांची दोन लग्न झाली. धर्मेंद्र यांचे कुटुंब बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या कुटुंबांपैकी एक आहे. त्यांना एकूण सहा मुले आहेत. धर्मेंद्र हे बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहेत.
1954 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी प्रकाश काैर यांच्याशी लग्न केले. त्यावेळी धर्मेंद्र अभिनेते नव्हते. प्रकाश काैर आणि धर्मेंद्र यांची चार मुले आहेत. दोन मुले आणि दोन मुली. सनी आणि बॉबी देओल हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. मात्र, धर्मेंद्र यांच्या दोन्ही मुली चित्रपटांपासून दूर आहेत, त्या सामान्य आयुष्य जगतात. प्रकाश काैर यांच्या लग्नानंतर धर्मेंद्र यांनी बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनीसोबत लग्न केले. प्रकाश काैर यांच्यासोबत घटस्फोट न घेता त्यांनी हे लग्न केले होते.
1980 मध्ये धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत लग्न केले. त्यांच्यापेक्षा 13 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीशी लग्न केल्यानंतर त्यांना दोन मुली झाल्या. धर्मेंद्र आणि हेमा यांनी त्यांच्या मुलींची नावे ईशा आणि अहाना देओल आहे. धर्मेंद्र यांनी कायमच आपल्या सहा मुलांवर प्रचंड प्रेम केले. विशेष म्हणजे 13 मुलांचे आजोबा धर्मेंद्र होते. अभिनेत्याचा मोठा मुलगा सनी देओल याची पत्नी पूजा अजूनही प्रसिद्धीपासून दूर आहे.
धर्मेंद्र यांचा दुसरा मुलगा बॉबी देओलनेही त्याची बालपणीची मैत्रीण तान्या आहुजासोबत लग्न केले आहे आणि त्यांना आर्यमन आणि धरम अशी दोन मुले आहेत. कालपासून धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल विविध चर्चा रंगताना दिसल्या. त्यानंतर सलमान खानपासून अनेक बॉलिवूड कलाकार रूग्णालयात पोहोचले होते. धर्मेंद्र यांच्या आरोग्याबाबत विविध चर्चा सुरू असल्याचे बघायला मिळतंय.
