हात जोडले, भावुक झाल्या, हेमा मालिनींचा व्हिडीओ समोर, पती धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर….

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, अंत्यसंस्कारावेली हेमा मालिनी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

हात जोडले, भावुक झाल्या, हेमा मालिनींचा व्हिडीओ समोर, पती धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर....
hema malini
Image Credit source: instagram
| Updated on: Nov 24, 2025 | 9:22 PM

Dharmendra Death : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने सिनेजगतातून हळहळ व्यक्त केली जात आहे. धर्मेंद्र यांच्या जाण्याने बॉलिवूडचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे, अशी भावाना व्यक्त केली जात आहे. धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांची पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी इशा देओल उस्थित होत्या. धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर इशा देओल आणि हेमा मालिनी यांचा घरी जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. कारमध्ये बसल्यानंतर हेमा मालिनी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. कॅमेरे पाहताक्षणी त्यांनी सर्वांना होत जोडले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील दु:ख स्पष्टपणे दिसत होते.

हेमा मालिनी झाल्या भावुक

इशा देओल आणि हेमा मालिनी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. पिंकव्हिलीच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. विलेपार्ले स्मशानभूमी परिसरातील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये हेमा मालिनी आणि इशा देओल मीडियापुढे हात जोडताना दिसून आल्या. त्यानंतर लगेच कारमध्ये बसून त्या निघून गेल्या.

अंत्यसंस्काराला कोण कोण पोहोचलं होतं?

धर्मेंद्र यांचे बॉलिवूडमध्ये वेगळे वजन होते. कित्येक दशकं त्यांनी सिनेसृष्टीत काम केलेलं असल्याने त्यांचे वेगळे असे प्रस्थ होते. त्यामुळे बॉलिवूड जगतातील अनेक दिग्गज धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते. यावेळी पूर्ण देओल परिवार तसेच अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सलमान खान, सलीम खान, संजय दत्त, आमीर खान, अक्षय कुमार, दीपिका पादुकोन, रणवीर सिंह, शबाना आझमी, पून ढिल्लो यांच्यासह अनेक बडे कलाकार यावेळी उपस्थित होते.

धर्मेंद्र यांनी दिले अनेक हिट चित्रपट

दरम्यान धर्मेंद्र यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांची प्रकृती चांगली झाली होती. परंतु पुन्हा आजारी पडल्याने त्यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. धर्मेंद्र यांना बॉलिवुडमधील ही मॅन म्हणून ओळखले जाते. त्यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले होते. यातील चुपके-चुपके, शोले यासारखे काही चित्रपट तर आजही प्रेक्षकांना तेवढेच आवडतात. धर्मेंद्र यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटातील अनेक गीतं आजही लोकांच्या ओठावर आहेत.