AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझा वापर केला, ‘या’ अभिनेत्रीचा हैराण करणारा खुलासा, थेट आरोप करत…

अभिनेत्री ईशा मालवीय हिने काही गंभीर आरोप केले आहेत. बिग बॉस 17 मध्ये धमाका करताना ईशा मालवीय ही दिसली होती. आता ईशा मालवीय हिच्याकडून काही मोठे खुलासे करण्यात आले आहेत. हेच नाहीतर ईशा मालवीय हिने थेट म्हटले की, मला पश्चाताप होत आहे. आता ईशाच्या विधानाची चर्चा रंगताना दिसत आहे.

माझा वापर केला, 'या' अभिनेत्रीचा हैराण करणारा खुलासा, थेट आरोप करत...
Esha Malviya
| Updated on: Jul 05, 2024 | 2:23 PM
Share

अभिनेत्री ईशा मालवीय ही बिग बॉसमध्ये दिसली. सुरूवातीला धमाकेदार गेम खेळताना ईशा दिसली होती. ईशा मालवीयचा बॉयफ्रेंड समर्थ हा तिला सपोर्ट करण्यासाठी बिग बॉसमध्ये पोहचला होता. दुसरीकडे तिचा एक्स देखील बिग बॉसमध्ये सहभागी झाला. ईशा मालवीय हिच्यावर अनेक गंभीर आरोपही करण्यात आले. ईशा मालवीय आणि समर्थ यांचे काही दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले. बिग बॉसच्या घरात ईशा मालवीय हिची अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यासोबत खास मैत्री बघायला मिळाली. आता नुकताच मोठा खुलासा ईशा मालवीयने केलाय.

ईशा मालवीय ही बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर मोठ्या पडद्यावर दिसली नाहीये. उडारिया मालिकेतून ईशा मालवीयला खरी ओळख मिळाली. आता अनेक गोष्टींचा पश्चाताप होताना ईशा मालवीय हिला दिसत आहे. याबद्दलच ईशा मालवीय हिने खुलासा केलाय. ईशा मालवीय हिने एक मुलाखत दिलीये. यावेळी ती अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्याबद्दल बोलताना दिसली.

ईशा मालवीय म्हणाली की, मी खूप जास्त स्वार्थी लोकांना भेटले आणि त्यांच्यासोबत मैत्री केली, आता मला त्या गोष्टींचा पश्चाताप होत आहे. त्या लोकांनी फक्त आणि फक्त माझा वापर केला. मी ज्या लोकांसोबत मैत्री केली त्यांनी माझा वापर केला. कोणीच माझी इज्जत ठेवली नाही. समर्थ आणि अभिषेक तर माझे एक्स आहेत. बाकी सर्वांसोबत मी तर मनापासून मैत्री केली होती.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांना मी चांगले मित्र मानत होते. आता मला वाटते की, हीच माझी सर्वात जास्त मोठी चूक होती. मी माझ्या काही गोष्टी विचार करून सांगायला हव्या होत्या. मला आज पश्चाताप होत आहे की, मी अशा लोकांसोबत मैत्री केली. आता ईशा मालवीय हिच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

हेच नाहीतर बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर ईशा मालवीय ही विकी जैन याच्यासोबत पार्टी करताना देखील दिसली. बिग बॉसच्या घरात असताना ईशा मालवीय ही कायमच अंकिता लोखंडे हिच्या मागे फिरताना दिसत होती. आता अशी एक चर्चा आहे की, ईशा मालवीय आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये काहीतरी मोठा वाद झालाय. यामुळेच ईशा पश्चाताप होत असल्याचे म्हणत आहे.

Follow Us
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?