Janvhi Kapoor | ‘तिच्याशिवाय आमची दिवाळी अपूर्णच…’, जान्हवी श्रीदेवीच्या आठवणीत भावूक!

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिची बहीण खुशी आणि वडील बोनी कपूर अलीकडेच श्रीदेवीच्या चेन्नई येथील घरातून मुंबईला परतले आहेत.

Janvhi Kapoor | ‘तिच्याशिवाय आमची दिवाळी अपूर्णच...’, जान्हवी श्रीदेवीच्या आठवणीत भावूक!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Actress Janhvi Kapoor), तिची बहीण खुशी आणि वडील बोनी कपूर अलीकडेच श्रीदेवीच्या चेन्नई येथील घरातून मुंबईला परतले आहेत. आई श्रीदेवीच्या (Sridevi) आठणींसोबत जान्हवी आणि तिच्या कुटुंबाने चेन्नई स्थित या घरात छानसा वेळ घालवला आहे. दिवाळीच्या (Diwali 2020) या खास प्रसंगी जान्हवी कपूरने एका वृत्त पत्राला मुलाखत दिली. यात तिने आपल्या आईच्या अर्थात अभिनेत्री श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा दिला. ‘आई शिवाय आमची दिवाळी अपूर्णच’, असे म्हणताना जान्हवी भावूक झाली होती (Actress Janhvi Kapoor Missing Mom Sridevi on Diwali Occasion).

या मुलाखती दरम्यान जान्हवीने सांगितले की, तिची आई श्रीदेवी नेहमी म्हणायची की, दिवाळी, नवीन वर्ष आणि वाढदिवस या दिवशी नेहमी नवीन आणि चमकदार कपडे घालावे. आईच्या शिकवणीप्रमाणे यावर्षी ती नक्कीच काहीतरी नवीन, आईला आवडले असते असे कपडे परिधान करणार असल्याचे जान्हवी कपूरने म्हटले आहे. ‘आईच्या जाण्यानंतर आणि कोरोना महामारीच्या या काळात पहिल्यांदाच मी सणासाठी खास तयार होणार आहे’, असे जान्हवीने म्हटले.

‘दिवाळीच्या निमित्ताने नेहमीप्रमाणेच आम्ही घरीच लहानशी पूजा आयोजित करू’, असे ती म्हणाली. बालपणीच्या दिवाळीच्या आठवणी सांगताना जान्हवी कपूर म्हणाली की, ‘आम्ही लहानपणी चेन्नईत माझ्या आईच्या घरी जायचो. रस्त्यावरची, गल्ल्यांमधली सुंदर लाईटिंग बघायला एकत्र हिंडायचो. त्यानंतर आम्ही एकत्र बसून दक्षिण भारतीय पदार्थ आणि मॅंगो ज्यूस प्यायचो. तेव्हापासून आमची दिवाळी आंब्याच्या रसाशिवाय पूर्ण होतच नाही.’ (Actress Janhvi Kapoor Missing Mom Sridevi on Diwali Occasion)

श्रीदेवीचा अपघाती मृत्यू

अभिनेत्री श्रीदेवी तिच्या चित्रपट आणि सौंदर्यामुळे खूपच चर्चेत होती. 2018ला दुबईमध्ये असताना श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतला. दुबईस्थित हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा अचानक अपघाती मृत्यू झाला होता. श्रीदेवी यांनी मृत्यूपश्चात 247 कोटींची संपत्ती मागे ठेवली आहे. ही संपत्ती त्यांच्या दोन्ही मुलींच्या नावे करण्यात आली आहे.

जान्हवीचे रेट्रो फोटोशूट

आई, अभिनेत्री श्रीदेवी हिच्या पावलावर पाऊल ठेवत जान्हवी कपूरने देखील चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. ‘धडक’, ‘गुंजन सक्सेना’ या चित्रपटांत जान्हवी कपूर झळकली होती. अलीकडेच तिने रेट्रो लूकमध्ये खास फोटोशूट केले होते. हे फोटोशूट तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. जान्हवीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला होता. अनेकांना तिला पाहून अभिनेत्री श्रीदेवीची आठवण आली होती.

(Actress Janhvi Kapoor Missing Mom Sridevi on Diwali Occasion)

Published On - 2:45 pm, Sat, 14 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI