Janhvi Kapoor | श्रीदेवींच्या आठवणीत हळवी, जान्हवी कपूरकडून आई-वडिलांचा खास फोटो शेअर

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. जान्हवी कपूर तिची आई म्हणजेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे फोटो नेहमी शेअर करत असते. अलिकडेच इन्स्टाग्रामवर जान्हवी कपूरने आई श्रीदेवी आणि वडील बोनी कपूर यांचा एक फोटो शेअर केला आहे.

Janhvi Kapoor | श्रीदेवींच्या आठवणीत हळवी, जान्हवी कपूरकडून आई-वडिलांचा खास फोटो शेअर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. जान्हवी कपूर तिची आई म्हणजेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे फोटो नेहमी शेअर करत असते. अलिकडेच इन्स्टाग्रामवर जान्हवी कपूरने आई श्रीदेवी आणि वडील बोनी कपूर यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी एकमेकांना मिठी मारल्याचे दिसत आहे. असा फोटो जान्हवी कपूर शेअर केला आहे. (Janhvi Kapoor special photo share to Sridevi and Boney Kapoor)

मदर्स डेला जान्हवी कपूरने श्रीदेवीबरोबर बालपणातील एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला होता. जान्हवी कपूर श्रीदेवीच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. फोटो शेअर करताना जान्हवी कपूरने लिहिले आहे, यांचे ऐकले पाहिजे आणि यांच्यावर सर्वात जास्त प्रेम केले पाहिजे. हॅप्पी मदर्स डे श्रीदेवी यांचा पुण्यतिथी निमित्ताने मुलगी जान्हवी कपूर भावुक झाली होती. तिने सोशल मीडियावर भावूक कॅप्शन देत फोटो शेअर करत पोस्ट लिहिली होती. जान्हवीने आपल्या ईन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये फोटो शेअर केला होता. तो फोटो पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, या फोटोमध्ये जान्हवी आणि श्रीदेवी आहे. या फोटोमध्ये श्रीदेवी यांनी जान्हवीला आपल्या कुशीत घेतल्याचे दिसत आहे. “माझं ह्रदय नेहमीच जड झालेलं असतं. पण मी चेहऱ्यावर हसू ठेवून वावरते. कारण माझ्या हृदयात तू राहतेस, अशी भावनिक पोस्ट तिने फोटोसोबत लिहिली होती. दरम्यान 24 फेब्रुवारी 2018 ला श्रीदेवी यांचे दुबईमध्ये एका हॉटेलमधील बाथरुममध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. अचानक झालेल्या या घटनेने संपूर्ण देश हळहळला होता. श्रीदेवींच्या चाहत्यांनाही या घटनेने धक्का बसला होता. आईच्या जाण्याने मला खुप धक्का बसला, अजूनही मी त्यातून बाहेर पडू शकली नाही”, असं जान्हवी कपूरने एका मुलखतीमध्ये सांगितले होते.

संबंधित बातम्या :

श्रीदेवीवर माझं प्रेम होतं, पण… : आमीर खान

अभिनेत्री श्रीदेवींची हत्या झाली, IPS अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

(Janhvi Kapoor special photo share to Sridevi and Boney Kapoor)

Published On - 6:40 pm, Tue, 27 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI