श्रीदेवीवर माझं प्रेम होतं, पण… : आमीर खान

श्रीदेवीवर माझं प्रेम होतं, पण... : आमीर खान

मुंबई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबाबत अभिनेता आमीर खान याने स्मृतींना उजाळा दिला. श्रीदेवी यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगताना आमीर खान म्हणाला, “श्रीदेवी मला प्रचंड आवडत होती, माझं तिच्यावर प्रेम होतं. मात्र मी हे कधीत तिला सांगू शकलो नाही.” जागरण डॉट कॉम या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत आमीर खान याने श्रीदेवी यांच्यासंदर्भातील आठवणींना उजाळा दिला.

आमीर खान नेमकं काय म्हणाला?

‘‘मी श्रीदेवीचा मोठा फॅन होतो. तेव्हा मी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नव्हतं. तेव्हा श्रीदेवीला पहिल्यांदा भेटलो होतो. त्यावेळी मी प्रचंड नर्व्हस होतो. त्यामुळे मी श्रीदेवीच्या नजरेला नजरही भिडवू शकलो नाही. कारण त्याकाळी श्रीदेवी मोठी सुपरफास्टर होती. पण माझं श्रीदेवीवर एकतर्फी प्रेम होतं.”, अशा आठवणी आमीर खान याने सांगितल्या.

आमीर खान पुढे म्हणाला, “श्रीदेवीसोबत काम करण्याची इच्छा ही केवळ इच्छाच राहिली. मात्र, एका मासिकासाठी श्रीदेवी आणि मी एकत्र फोटोशूट केलं होतं. श्रीदेवीसोबत पहिल्यांदा काम करताना मी नर्व्हस होतो. त्यामुळे श्रीदेवीसोबत बोलू ही शकलो नाही. मात्र, श्रीदेवी आवडते, हे बोनी कपूर यांना सांगितल्यावर ते अवाक झाले होते.”

आमीर खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासंदर्भात वेबसाईटला आमीर खानने मुलाखत दिली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI