AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सैफ अली खानच्या शेजारी राहते ‘ही’ अभिनेत्री, इमारतीच्या सुरक्षेतील त्रुटींबद्दल म्हणाली…

Saif Ali Khan: उच्चभ्रू सोसायट्यांमधील सुरक्षा वाऱ्यावर... सैफ अली खानच्या शेजारी राहणारी अभिनेत्री म्हणाली, 'गेल्या 1 महिन्यापासून मी सतत...', इमारतीच्या सुरक्षेतील त्रुटींबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

सैफ अली खानच्या शेजारी राहते 'ही' अभिनेत्री, इमारतीच्या सुरक्षेतील त्रुटींबद्दल म्हणाली...
| Updated on: Jan 17, 2025 | 11:17 AM
Share

अभिनेता सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारी रोजी मध्यरात्री हल्ला झाला आहे. अभिनेत्याच्या राहत्या घरी म्हणजे वांद्रे याठिकाणी फ्लोअर पॉलिशिंगचं काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी अभिनेत्यावर हल्ला केला आहे. सध्या अभिनेत्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्लेखोराने वार केल्याने सैफला सहा जखमा झाल्या. सैफ अली खानला पहाटे 3.30 वाजता मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता अभिनेत्याती प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, करीना आणि सैफ यांच्या समोरच्या इमारतीत राहणारी अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने इमारतीच्या सुरक्षेतील त्रुटींबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. करिश्मा म्हणाली, ‘सध्या इमारतीच्या बाहेरचं चित्र प्रचंड भयानक आहे. सर्वत्र पोलीस आणि मीडिया दिसत आहे.’

सुरक्षेबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मी गेल्या वर्षापासून इमारतीच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी करत आहे. वॉचमनला योग्य प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. अशा आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी ते पूर्णपणे तयार नाहीत. जर चोर घुसला तर कुटुंब स्वतःचे संरक्षण कसे करणार? हे भयानक आहे…’

पुढे अभिनेत्री म्हणाले, ‘घडलेल्या घटनेनंतर इतर लोकं सावध होतील अशी अपेक्षा मी करते. अशा संकटाचा सामना करण्यास कोणतंही कुटुंब तयार नाही. आता माझ्या इमारतीची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येईल… यावर माझा विश्वास आहे.’ सध्या सर्वत्र सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याची चर्चा रंगली आहे.

सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांची चौकशी

मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा यांच्यात योग्य समन्वय नसल्यामुळे तपासावर परिणाम होत आहे. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा व्यक्ती ३२ तासांनंतरही फरार आहे. वांद्रे पोलीस संपूर्ण माहिती देत ​​नसल्याचा दावा गुन्हे शाखेच्या सूत्रांनी केला आहे. तब्बल 5 तासांनंतर मध्यरात्री या हल्ल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. वांद्रे पोलिसांकडे या गुन्ह्याशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर आहे.

पोलिस आणि गुन्हे शाखेच्या श्रेयवादाचा फायदा आरोपीला होत असल्याचे दिसत आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांना अजूनही आरोपीची माहिती मिळत नाही. त्यामुळे आरोपीचा शोध घेण्यासाठी त्या वेळी वांद्रे टर्मिनसवरून जाणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये लोकांना पाठवले जात आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी रिक्षा चालवणाऱ्या सर्व ऑटोचालकांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

Follow Us
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन