ऐश्वर्या असताना अभिषेक बच्चनच्या आयुष्यात आणखी एक अभिनेत्री? कुणाशी चाललंय गुलूगुलू? अभिनेत्रीनेही सांगितली ती गोष्ट
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल मध्यंतरी बऱ्याच काही गोष्टींवर रंगत होत्या. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाही. अभिषेकचे नाव एका अभिनेत्रीसोबत जोडले जातंय.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन घटस्फोट घेणार असल्याची मध्यंतरी तूफान चर्चा रंगताना दिसली. मात्र, यावर कोणीही भाष्य केले नाही. हेच नाही तर अभिषेक बच्चन हा अभिनेत्री निमरत कौर हिला डेट करत असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. निम्रत काैरमुळेच अभिषेक आणि ऐश्वर्याचा घटस्फोट होत असल्याचे कळताच लोकांनी तिला टार्गेट करण्यास सुरूवात केली. मात्र, सर्व सर्वांवर तिने माैन बाळगले होते.
आता नुकताच यावर निम्रत कौरने थेट भाष्य केले. निम्रत कौर ही एका चॅनलच्या कार्यक्रमात पोहोचली होती. यावेळी तिला अभिषेक बच्चन याच्याबद्दल विचारण्यात आले. यावेळी तिने म्हटले की, माझ्या आयुष्यात माझे लक्ष कशावर केंद्रित असले पाहिजे हे मला अगदी स्पष्ट महिती आहे. मुळात म्हणजे मी मुंबईत सोशल मीडियासाठी आले नाहीये. त्यावेळी त्याचे अस्तित्व देखील काहीच नव्हते. साधे स्मार्ट फोन देखील नव्हते.
माझ्या आयुष्यात माझे एकच ध्येय आहे ते म्हणजे माझे काम वाढवणे. बाकी या रिकाम्या गोष्टी आहेत. ज्यांच्याकडे आयुष्य आणि वेळेचा वापर करून काहीतरी चांगले करण्यासाठी भरपूर वेळ आहे. त्यांच्याबद्दल मला दया येते. मला त्यांच्याबद्दल वाईट वाटते. त्यांच्या गैरवापराबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल मला वाईट वाटते, असेही निम्रत कौरने म्हटले. सतत चर्चा रंगताना दिसते की, अभिषेक बच्चन हा निमरत कौरला डेट करतोय.
पहिल्यांदाच स्पष्ट बोलताना निम्रत कौर ही दिसली आहे. मात्र, तिने कोणाचेही नाव घेणे टाळले आहे. घटस्फोटाच्या चर्चांनंतर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे अनेकदा स्पॉट होताना दिसले. ज्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा या फक्त आणि फक्त अफवा असल्याचे सांगितले गेले. हेच नाही तर मागे अनेकदा ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या हिला घेऊन विदेशात जाताना बऱ्याचदा दिसली. यावेळी एकदाही अभिषेक बच्चन हा त्यांच्यासोबत अजिबातच दिसला नाही.
