VIDEO | विवाहित पुरुषासाठी वेडी झालेली बाई पाहिलीय का? अँकरच्या प्रश्नावर रेखा म्हणल्या “मला विचारा ना”

अनिश बेंद्रे

|

Updated on: Apr 04, 2021 | 12:42 PM

इंडियन आयडल 12 च्या 'मल्लिका ए इश्क रेखा' या विशेष भागात खुद्द रेखा पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. (Rekha Amitabh Bachchan Indian Idol )

VIDEO | विवाहित पुरुषासाठी वेडी झालेली बाई पाहिलीय का? अँकरच्या प्रश्नावर रेखा म्हणल्या मला विचारा ना
जय भानुशाली, रेखा, अमिताभ बच्चन
Follow us

मुंबई : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि दिग्गज अभिनेत्री रेखा (Rekha) यांचे नाते म्हणजे जणू ओपन सिक्रेट आहे. बिग बी आणि रेखा यांच्यात न बहरु शकलेल्या नात्याच्या चर्चा चार दशकानंतरही चवीने रंगतात. अमिताभ बच्चन याबाबत कधीही उघड भाष्य करत नाहीत, मात्र रेखा याविषयी मिष्कीलपणे टिप्पणी करताना आपण याआधीही पाहिलं आहे. याचं ताजं उदाहरण इंडियन आयडलच्या (Indian Idol 12) सेटवर दिसलं. (Actress Rekha quick replies to Jay Bhanushali on woman fall for a married man hinting at Amitabh Bachchan at Indian Idol 12 show)

इंडियन आयडल 12 च्या ‘मल्लिका ए इश्क रेखा’ या विशेष भागात खुद्द रेखा पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमाचा अँकर जय भानुशालीने (Jay Bhanushali) प्रश्न विचारला, “रेखाजी, नेहू (नेहा कक्कर), कधी तुम्ही एखाद्या महिलेला एका पुरुषासाठी इतकं वेडं होताना पाहिलं आहे का? तेही विवाहित पुरुषासाठी” जय मनात कुठलाही हेतू न बाळगता अनवधानाने बोलून गेला होता. मात्र रेखा यांनी तो धागा अचूक पकडला “मला विचारा ना” असं पटकन म्हटलं.

रेखा यांच्या उत्तराने जय क्षणभर बावचळला. त्यानंतर रेखा यांनी मिष्कीलपणे “मी तर काहीच बोलले नाही” असं म्हणत नामानिराळं असल्याचा आव आणला आणि त्या इथे-तिथे पाहायला लागल्या. रेखा यांच्या उत्तरावर परीक्षक नेहा कक्कर आणि विशाल ददलानी यांनाही हसू आवरेना. विशाल उभं राहून टाळ्या वाजवायला लागला, तर नेहाही दिलखुलास हसायला लागली. प्रेक्षकही खळखळून हसायला लागले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. हसून पुरेवाट झालेल्या जयनेही “क्या बात है, ये लगा सिक्सर” अशी प्रतिक्रिया दिलं. त्यावर रेखा यांनी मिश्किल हास्य केलं.

पाहा व्हिडीओ :

अमिताभ आणि रेखा यांची जोडी बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी होती. या दोघांच्या नात्याबद्दल सर्वश्रृत आहे. यावर आजपर्यंत अमिताभ आणि रेखा यांनी थेट उघडपणे बोलणं टाळलं आहे. दोघांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपट केले आहेत. (Rekha Amitabh Bachchan Indian Idol )

रेखांकडून बिग बींची नक्कल

काही महिन्यांपूर्वी मुकद्दर का सिकंदर या गाण्यावर एका स्पर्धकाने रेखा यांच्याबरोबर परफॉर्मन्स दिला होते. त्यावेळी हे गाणे ज्या प्रकारे अमिताभ बच्चनवर चित्रित केले गेले होते, त्याच प्रकारे रेखा यांनी इंडियन आयडॉलच्या स्टेजवर हार्मोनियमजवळ बसून अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे बाईक चालवल्याची नक्कल केली होती.

अमिताभ यांचा फोटो पाहून पळ

फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर इव्हेंटदरम्यान काही वर्षांपूर्वी असाच एक गमतीदार प्रकार घडला होता. रेखा फोटोग्राफर्सना पोज देत होत्या, त्याचवेळी त्यांनी मागे वळून पाहिलं असता, त्यांना बॅकग्राऊंडला अमिताभ बच्चन यांचा फोटो दिसला होता आणि त्या तातडीने तिथून बाजूला निघून गेल्या होत्या.

संबंधित बातम्या :

VIDEO : अमिताभचा फोटो पाहून रेखा पाहा काय म्हणाली….!

Video | Indian Idol 12 च्या मंचावर रेखाला आली अमिताभ बच्चनची आठवण, ‘मुकद्दर’च्या गाण्यावर केली बिग बींची नक्कल!

Actress Rekha quick replies to Jay Bhanushali on woman fall for a married man hinting at Amitabh Bachchan at Indian Idol 12 show

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI