AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Richa Chadha: अभिनेत्री ऋचा चढ्ढा यांच्या लग्नाचे दागिने असतील खूप ‘खास’ ; कुटुंब लागले तयारीला

ऋचा आणि अलीच्या प्रत्येक फंक्शनची तारीख ठरलेली आहे. दोघांचे प्री-वेडिंग फंक्शन 30 सप्टेंबरपासून सुरू होईल, जे तीन दिवस चालेल. या जोडप्याचा मेहंदी आणि संगीत सोहळा 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे

Richa Chadha: अभिनेत्री ऋचा चढ्ढा यांच्या लग्नाचे दागिने असतील खूप 'खास' ; कुटुंब लागले तयारीला
Richa Chadha,Image Credit source: Instagram
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Sep 20, 2022 | 6:16 PM
Share

बॉलिवूडमधील कपल ऋचा चढ्ढा(Richa Chadha) आणि अली फजल(Ali Fazal) लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. . सप्टेंबरच्या अखेरीस त्यांचे लग्नापूर्वीचे सोहळे सुरू होणार आहेत. दोघेही त्यांच्या लग्नाबद्दल खूप आनंदी आहेत . दोघेही लग्नात कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत. यामुळेच लग्नाशी(marriage) संबंधित प्रत्येक फंक्शन खूप खास असणार आहे. त्याचबरोबर ऋचाही तिच्या लग्नात शाही नववधूप्रमाणे सजण्याची तयारी करत आहे.

ऋचाच्या प्री-वेडिंग फंक्शन आणि लग्नासाठी खास दागिने तयार केले जात आहेत. अभिनेत्रीच्या दिल्लीतील फंक्शनसाठी, वधूचे दागिने बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेले 175 वर्षीय बिकानेर-स्थित ज्वेलर्स कुटुंब हे दागिने तयार करत आहे. ते ज्वेलरी बनवणारे कुटुंब कारागिरीसाठी ओळखले जाते. ऋचाच्या लग्नासाठी तो एक सिग्नेचर पीस डिझाईन केला जाणार आहे .

ऋचा आणि अलीची प्रेमकहाणी 2012 मध्ये ‘फुक्रे’ चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती, पण ते पहिल्या नजरेत प्रेम नव्हते. दोघांची पहिली मैत्री. भेटीगाठी वाढल्या आणि मग प्रेमाची ठिणगी पेटली. अलीने ऋचाला मालदीवमध्ये फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केले होते. त्याने रिचाला जेवायला नेले आणि जेवण संपताच अलीने शॅम्पेनची बाटली उघडली आणि गुडघ्यावर बसून रिचाला विचारले, ‘तू माझ्याशी लग्न करशील का?’ अर्थातच उत्तर फक्त ‘हो’ मध्ये यायचे होते.

ऋचा आणि अलीच्या प्रत्येक फंक्शनची तारीख ठरलेली आहे. दोघांचे प्री-वेडिंग फंक्शन 30 सप्टेंबरपासून सुरू होईल, जे तीन दिवस चालेल. या जोडप्याचा मेहंदी आणि संगीत सोहळा 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे. लग्न 6 ऑक्टोबरला होणार असून लग्नाचे रिसेप्शन 2 आणि 7 ऑक्टोबरला होणार आहे. लग्नाआधीचे कार्यक्रम दिल्लीत आटोपल्यानंतर हे जोडपे मुंबईत सप्तपदीचा सोहळा करणार आहेत.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना