‘केलेल्या कर्माचा हिशोब…’, पतीच्या निधनानंतर अभिनेत्रीला सतावत होती ‘या’ गोष्टीची भीती

केलेल्या कर्माची फळ प्रत्येका एकना एक दिवस.... , पतीच्या निधनानंतर अभिनेत्रीसोबत असं काय झालं, ज्यामुळे तिला सतावत होता 'या' गोष्टीची भीती

'केलेल्या कर्माचा हिशोब...', पतीच्या निधनानंतर अभिनेत्रीला सतावत होती 'या' गोष्टीची भीती
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 2:41 PM

Actress sadhana life story : एक काळ होता जेव्हा नीतू कपूर, जया बच्चन, आशा पारेख यांसारख्या अभिनेत्रींसोबत साधना यांचं नाव देखील बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक होतं. साधना यांच्या अदा आणि सौंदर्यावर फक्त चाहतेच नाही तर, अनेक सेलिब्रिटी देखील फिदा होते. साधना यांची हेअरस्टाईल देखील तुफान चर्चे आली. त्यामुळे त्यांची हेअरस्टाईलची ओळख आजही ‘साधना कट’ म्हणून प्रसिद्ध आहे. साधना यांनी ६० ते ८० च्या दशकात अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलं. मोठ्या पडद्यावर यश मिळालं असलं तरी, खासगी आयुष्यात मात्र साधना यांनी अनेक वाईट प्रसंगांचा सामना केला आहे.

बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना साधना यांनी एका दिग्दर्शकासोबत लग्न केलं. साधना यांनी अनेक अभिनेत्यांसोबत भूमिका साकारल्या. पण कोणसोबतच त्यांचे खास संबंध तयार झाले नाहीत. पण दिग्दर्शक आर. के. नय्यर यांनी साधना यांच्या मनावर राज्य केलं. तेव्हा ‘लव्ह इन शिमला’ या सिनेमाचं दिग्दर्शन नय्यर यांनी केलं होतं.

‘लव्ह इन शिमला’ सिनेमात साधना यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. सिनेमानंतर १९६६ साली दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर साधना त्यांच्या वैवाहिक आयुष्यात प्रचंड आनंदी होत्या. पण १९९५ साली नय्यर यांचं निधन झालं आणि साधना एकट्या झाल्या. पतीच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक संकटं आली.

हे सुद्धा वाचा

पतीच्या निधनानंतर तीन महिन्यात नोटीस देवून साधना यांचा प्रॉडक्शन हाउस बंद करण्यात आला. जे प्रॉडक्शन हाउस साधना यांच्या पतीने सुरु केलं होतं. त्यानंतर झगमगत्या विश्वापासून साधना यांनी दूर जाण्याचं ठरवलं. साधना यांना स्वतःचं बाळ नसल्यामुळे त्यांनी पतीच्या निधनानंतर एकटं एकटं वाटू लागलं.

२०१२ साली दिलेल्या एका मुलाखतीत साधना म्हणाल्या, ‘सुरुवातील मला फार एकटं वाटयचं. माझं स्वतःचं बाळ नाही. पण मी अशा अनेक महिलांना पाहते, जे मुलं आणि सुनांमुळे त्रासलेल्या आहेत. मला कायम एक भीती सतावते मला काही झालं, तर मझ्यासोबत कोणीही नाही. पण ज्यांना मुलं आहेत, ते देखील मुलांवर अवलंबून राहू शकत नाहीत…’

आयुष्यात एकटं वाटत असल्यामुळे साधना यांनी एका मुलीली दत्तक घेतलं. त्या मुलीचा जन्म होवून फक्त ५ मिनिटं झाली होती. त्यानंतर साधना त्या मुलीच्या आई – वडिलांसोबत राहू लागल्या. दत्तक घेतलेल्या मुलीबद्दल साधना म्हणाल्या, ‘मला तिच्याकडून कहीही नको होतं, कारण मला तिच्याकडून भरपूर प्रेम मिळत होतं.’

एवढंच नाही तर, साधना यांनी त्या मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी देखील विचार केला होता. त्या म्हणाल्या ‘मला कर्मावर विश्वास आहे. आज आपण जे कर्म करु त्याचा हिशेब आपल्याला फेडायचा आहे…’ साधना यांचं निधन २५ डिसेंबर २०१५ मध्ये झालं. पण आजही त्यांच्याबद्दल अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.