प्रसिद्ध अभिनेत्रीची फसवणूक; कॉन्ट्रॅक्टरने लावला लाखो रुपयांचा चुना

"धडा शिकवावा लागेल"; ठेकेदाराच्या फसवणुकीनंतर अभिनेत्रीकडून राग व्यक्त

प्रसिद्ध अभिनेत्रीची फसवणूक; कॉन्ट्रॅक्टरने लावला लाखो रुपयांचा चुना
संभावना सेठImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Nov 14, 2022 | 8:25 AM

मुंबई- अभिनेत्री संभावना सेठची एका कॉन्ट्रॅक्टरने फसवणूक केली. संभावनाने नुकतंच घर विकत घेतलं. या घराच्या इंटेरिअर डिझायनिंगसाठी तिने एका कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधला होता. मात्र संबंधित ठेकेदाराने तिची फसवणूक केली. घराच्या इंटेरिअरचं सर्व काम त्याच्यावर सोपवल्यानंतर आणि कामाचे पैसे आधीच दिल्यानंतरही आता तो ठेकेदार कामावर येत नसल्याची तक्रार तिने केली. संभावनाने याविषयी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला.

कामाचे पैसे आधीच घेतल्यानंतरही ठेकेदार विविध कारणं देऊन काम टाळत असल्याचं तिने म्हटलंय. कधी स्वत: आजारी असल्याचं सांगून तर कधी कामगार नाही असं म्हणत तो टाळाटाळ करत असल्याची तक्रार संभावनाने केली.

हे सुद्धा वाचा

“एखाद्यावर विश्वास तरी कसा करायचा? त्या ठेकेदारावर पूर्ण विश्वास ठेवून मी त्याला आधीच पैसे दिले आणि आमची फसवणूक करून तो पळून गेला. संबंधित व्यक्ती जर कधी तुम्हाला भेटला आणि त्याने असा दावा केला की संभावनाच्या घरी मी इंटेरिअरचं काम केलंय, तर अजिबात विश्वास ठेवू नका”, असं ती या व्हिडीओत म्हणाली. संभावनाचा पती अविनाशसुद्धा या व्हिडीओत राग व्यक्त करताना दिसतो.

याप्रकरणी संबंधित ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल करण्याचा विचार दोघं करतात. मात्र नंतर पुनर्विचार करत ठेकेदाराकडून काहीही झालं तरी घराचं काम पूर्ण करून घेणार, असं म्हणतात. संभावना सेठचा युट्यूबवर मोठा चाहतावर्ग आहे. रोजच्या जीवनातील घडामोडी ती व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत ठेकेदाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.