AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathi Language Row : ‘काही निहायती गवार लोक…’ अभिनेत्रीची मराठी माणसाला हिणवणारी, चीड आणणारी वक्तव्य

Actress Sarika Salunkhe : मराठी सक्तीवरुन वातावरण तापलेलं असताना अभिनत्री सारिका साळुंखे हिने मोठं विधान केलं आहे. अभिनेत्रीने मनसेवर संताप व्यक्त करत एक व्हिडीओ पोस्ट केलाय. सध्या तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Marathi Language Row : ‘काही निहायती गवार लोक…’ अभिनेत्रीची मराठी माणसाला हिणवणारी, चीड आणणारी वक्तव्य
| Updated on: Aug 27, 2026 | 11:17 AM
Share

Actress Sarika Salunkhe : महाराष्ट्रात सरकारने ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालवणाऱ्या व्यावसायिक चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य केलं आहे. पण अनेकांनी निर्णायाचा विरोध केला आहे. आता अभिनेत्री सारिका साळुंखे हिने देखील मराठी सक्तीचा विरोध करत मनसेवर निशाणा साधला आहे. मराठी-अमराठी भाषेच्या वादावर अभिनेत्री सारिका साळुंखे हिने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सध्या तिच्या वादग्रस्त वक्तव्याच्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, लोखंडवाल्यात घर न मिळाल्यानं रडणारी सारिका आता मनसेवरच बरसली आहे. ऑटो वाल्यांनाच का टार्गेट करता, मोठ्या हॉटेलात जा.. असं देखील अभिनेत्री म्हणाली आहे. सारिका साळुंखे आहे जिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रडत रडत मुंबईतील लोखंडवाला परिसरात स्वतःला मराठी मुलगी सांगून घर मिळत नसल्याची व्यथा मांडली होती, त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते तिच्या मदतीसाठी पुढे आले होते.

आता मनसेलाच टार्गेट करत सारिका साळुंखे हिने मराठी-अमराठी मुद्द्यावरून सोशल मीडियावर वादग्रस्त व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत सारिका म्हणतेय, ‘काही निहायती बेवकूफ गवार लोक आहेत, जे फक्त ऑटो वाल्यांनाच टार्गेट करत आहेत.. जा ना मोठ-मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आणि मोठ-मोठ्या हॉटेलमध्ये त्यांनाही बोला मराठी बोलण्यासाठी म्हणा.

‘काही मराठी लोक इतके दुटप्पी असतात की. ते बोलतात महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोला आणि स्वतः थिएटरमध्ये जाऊन हिंदी सिनेमा पाहतात. तुम्ही काही फंक्शन आणि इव्हेंट ठेवता त्यात हिंदी आर्टिस्टला बोलावता, जर तुमच्यात एवढाच मराठीचा अभिमान आहे तर मराठी अॅक्टरला संधी द्या ना. तुम्ही म्हणता, तू तर पॉर्न स्टार आहेत तुला कोण बोलवेल. तर बोल्ड आर्टिस्ट आणि पॉर्नस्टारमध्ये फरक आहे. घाणेरडे विचार असणाऱ्यांना हे कळणार नाही.

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मला महाराष्ट्रात इव्हेंट्स नकोच आहेत. म्हणून मी मराठी इंडस्ट्रीमध्ये कामही करत नाही,2 – 5 हजारमध्ये… 12 – 13 तास शुट… मी तर मस्त हैदराबाद येथे राहते. पण तिथे असलेल्या मराठी कलाकारांना तुम्ही संधी ज्या. तुम्ही आपल्या लोकांना ट्रोल करता आणि दुसऱ्यांना डोक्यावर बसवता आणि म्हणता मराठी बोला…’, अभिनेत्रीच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर कारवाईची मागणी होण्याची शक्यता नकारता येत नाही.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे