Tejashri Pradhan : तेजश्री प्रधानची नवी सुरूवात, खास फोटो शेअर करत दिले अपडेटस
टीव्ही मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आता तिचा आणखी एक प्रोजेक्ट सुरू होत असून खास फोटो टाकत तिने त्याचे अपडेट्स, नव्या भूमिकेतील नावही शेअर केलं आहे.

‘होणार सून मी या घरची’, ‘प्रेमाची गोष्ट’असो किंवा ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आपलं निखळ हास्य आणि मनमोहक अभिनयाने सर्वांच मन जिंकून घेणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान नेहमी चर्चेत असते. सध्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये स्वानंदीच्या भूमिकेत दिसणाऱ्या तेजश्रीचा, लग्नाचा ट्रॅक सुरू असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र या मालिकेदरम्यानच तिने नवे काही अपडेट्स टाकल्याने ती ही मालिका सोडणार का अशी चर्चा सुरू झाली होती. सोशल मीडिया अकाऊंटवर तेजश्रीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ती सोप्यावर बसलेली असताना समोर बसलेली व्यक्ती कागदपत्र दाखवत काही समजावत असल्याचं दिसतं होतं.
तिच्या नव्या प्रोजेक्टची हिंट यातून प्रेक्षकांना, चाहत्यांना मिळाली. तसेच तिने ‘नवीन वेब सीरिज’ आणि ‘नवीन काम’ असे हॅशटॅगही दिले होते. पण आधीची मालिका सुरू असताना आता तेजश्री ते काम सोडणार का अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली होती.
तेजश्रीने केला मोठा खुलासा , भूमिकेचं नाव
मात्र असं काही नसून तेजश्रीचा नव्या प्रोजेक्टचा शुभारंभ होत असला तरी तिची मालिकाही तशीच सुरू राहणार असल्याचे पुढे आले. आता यानंतर तेजश्रीने तिच्या अधिकृत अकाऊंटवरून नव्या कामाचे आणखी अपडेट्स सुरू केले असून त्या भूमिकेबद्दल, तिचं नाव काय असेल याबद्दलही खास फोटोंतून माहिती शेअर केली आहे.
View this post on Instagram
गुलाबी शर्ट, निळी जीन्स अशा कूल लूकमध्ये असलेल्या तेजश्रीने केस मागे बांधले होते. तिच्या नव्या प्रोजेक्टला, एका वेबसीरिजला सुरूवात झाल्याचे. तेजश्रीच्या हातातील क्लॅपवरून दिसत होते. त्यासोबतच तिचेन खास कॅप्शन लिहीत तिच्या भूमिकेचं नावही जाहीर केलं. ‘दियाला भेटा’ असं तिने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे. म्हणजे या नव्या प्रोजेक्टमध्ये तेजश्री जी भूमिका साकारत आहे, तिचं नाव दिया असेल हे समोर आलंय. या भूमिकेबद्दल आणखी अपडेट्स लवकरच शेअर करेन असंही तेजश्रीने लिहीलं आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या हजारो लाईक्स, कमेंट्स आल्या आहेत. अनेकांन तिला नव्या कामासाठी शुभेच्छा देत, अभिनंदनही केलं आहे. या लूकमध्ये खूप सुंदर दिसतेस, तू कोणताही आऊटफिट ग्रेसफुली कॅरी करू शकतेस असं लिहीत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
