Video | ‘शेरनी’मध्ये विद्या बालन दिसणार धडाकेबाज वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत, पाहा जबरदस्त टीझर

विद्या बालनने नुकतेच तिच्या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आता त्यांनी या चित्रपटाचा जबरदस्त टीझर रिलीज केला आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये आपल्याला जंगलांविषयी बोलत असलेल्या विद्या बालनचा आवाज ऐकू येतो.

Video | ‘शेरनी’मध्ये विद्या बालन दिसणार धडाकेबाज वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत, पाहा जबरदस्त टीझर
विद्या बालन
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 2:47 PM

मुंबई : बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिने आज तिच्या ‘शेरनी’ (Sherni) या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. विद्या बालनने नुकतेच तिच्या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आता त्यांनी या चित्रपटाचा जबरदस्त टीझर रिलीज केला आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये आपल्याला जंगलांविषयी बोलत असलेल्या विद्या बालनचा आवाज ऐकू येतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित मसुरकर यांनी केले आहे. याआधी त्यांनी ‘न्यूटन’ हा चित्रपट बनवला आहे (Actress Vidya Balan Share her upcoming movie Sherni teaser on social media).

चित्रपटाच्या जबरदस्त टीझरमध्ये विद्या बालन म्हणाते आहे की, “जंगलात कितीही घनदाटपणा असला तरी, सिंहाला मार्ग सापडतोच!” हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. विद्या या चित्रपटाविषयी बर्‍याच दिवसांपासून उत्साही होती. या चित्रपटाद्वारे अभिनेत्री आपल्याला वन अधिकाऱ्याचा प्रवास दाखवणार आहे, यात बरेच साहस पाहायला मिळणार आहे. ‘शेरनी’ ही एक काल्पनिक कथा आहे ज्याद्वारे आपण विद्या मानवी आणि प्राणी यांच्यातील संघर्ष संतुलित करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहोत. या चित्रपटाचा ट्रेलर 2 जून रोजी रिलीज होणार आहे. त्याआधी चित्रपटाच्या टीझरमुळे लोकांचा उत्साह आणखी वाढला आहे.

पाहा जबरदस्त टीझर :

View this post on Instagram

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

 (Actress Vidya Balan Share her upcoming movie Sherni teaser on social media)

चित्रपटांच्या रूपरेषा बदलणार

भूषण कुमार, विक्रम मल्होत्रा या चित्रपटाचे निर्माते ​​आहेत. जिथे आपण या चित्रपटात शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राज, इला अरुण सारख्या बड्या कलाकारांना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. जून 2021मध्ये ‘शेरनी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्रीने घेतलेला जोखीम घेणे तिच्यासाठी खूप महत्वाचे होते. बॉलिवूडमध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षकांची मागणी होती की, सध्या आऊट ऑफ द बॉक्स जाऊन काही चित्रपट बनवावेत. त्यानंतर आयुष्मान खुरानाच्या ‘आर्टिकल 15’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसायही केला. त्याच प्रकारे चित्रपटांमध्ये सतत बदल केले जात आहेत. जे आगामी काळात बॉलिवूड चित्रपटांच्या रूपरेषा बदलतील.

अभिनेत्री विद्या बालनच्या चाहत्यांकरिता हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाची मेजवानी

2020 मध्ये ‘शकुंतला देवी’वर प्रेमाचा वर्षाव झाला, या चित्रपटातही विद्या बालनला प्रचंड उत्तम प्रतिसाद मिळाला होता.  या चित्रपटाला मिळालेल्या भरगोस यशानंतर अबंडनतिया एंटरटेनमेंटची ही नवीनकोरी कलाकृती ‘शेरनी’च्या माध्यमातून जगासमोर येतेय. शेरनीचं कथानक फारच विशेष आणि अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे अभिनेत्री विद्या बालनच्या चाहत्यांकरिता हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाची मेजवानी असणार हे नक्की आहे. कारण यापूर्वी कधीही न साकारलेल्या वनाधिकाऱ्याच्या भूमिकेत विद्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. शेरनी’चं ‘फर्स्ट डे फर्स्ट स्ट्रीम’ आता लवकरच होणार आहे.

(Actress Vidya Balan Share her upcoming movie Sherni teaser on social media)

हेही वाचा :

Photo : OTT वर पाहा ‘हे’ धमाकेदार क्राईम थ्रिलर सिनेमे, प्रेक्षकांची मिळतेय खास पसंती

Sushant Singh Rajput Case | सिद्धार्थ पिठाणीनंतर NCB करणार सुशांतच्या नोकरांची चौकशी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.