AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput Case | सिद्धार्थ पिठाणीनंतर NCB करणार सुशांतच्या नोकरांची चौकशी

अलीकडेच अभिनेत्याचा मित्र आणि रूममेट सिद्धार्थ पिठाणी याला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली असून, आता अशी बातमी समोर येत आहे की, सुशांतच्या घरी काम करणाऱ्यांनाही एनसीबीने समन्स बजावले आहेत.

Sushant Singh Rajput Case | सिद्धार्थ पिठाणीनंतर NCB करणार सुशांतच्या नोकरांची चौकशी
सुशांत सिंह राजपूत
| Updated on: May 31, 2021 | 1:23 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाला आता एक वर्ष पूर्ण होत आले आहे. त्याच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत पुन्हा गदारोळ सुरू झाला आहे. अलीकडेच अभिनेत्याचा मित्र आणि रूममेट सिद्धार्थ पिठाणी याला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली असून, आता अशी बातमी समोर येत आहे की, सुशांतच्या घरी काम करणाऱ्यांनाही एनसीबीने समन्स बजावले आहेत. एनसीबीने सुशांतच्या घरी काम करणारे नीरज आणि केशव यांना चौकशीसाठी बोलावले आहे (Sushant Singh Rajput Case NCB Summons actor ex servant neeraj and keshav).

नीरज आणि केशव यांची चौकशी केल्यानंतर या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होतील की, सिद्धार्थप्रमाणेच त्यांना देखील अटक केली जाईल का, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर  त्याचे दोन्हीही नोकर मुंबई सोडून गेले होते, परंतु आता परत आल्यानंतर हे दोघेही वेगवेगळ्या सेलेब्सच्या घरात काम करत आहेत.

सिद्धार्थ एनसीबी कोठडीत

सिद्धार्थ पिठाणी याला शुक्रवारी (28 मे) रोजी हैदराबादमधून अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याला 5 दिवस एनसीबी कोठडीत पाठवण्यात आले आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये तपासणी दरम्यान त्याला देखील अटक करण्यात आली होती. पण नंतर त्याला जामीन मिळाल्याने तो बाहेर आला होता. आता पुन्हा एकदा सिद्धार्थच्या अटकेनंतर एनसीबीला काही मोठी माहिती मिळण्याची शक्यता आहे (Sushant Singh Rajput Case NCB Summons actor ex servant neeraj and keshav).

ड्रग्स प्रकरणात मोठी नावे आली समोर

ड्रग्स प्रकरणाच्या तपासणीदरम्यान बॉलिवूडमधील अनेक बड्या सेलेब्सची नावे समोर आली होती. इतकेच नाही तर अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रुकल प्रीत सिंह यांच्याही एनसीबीने चौकशी केली होती. मात्र, या अभिनेत्रींविरूद्ध काहीच पुरावे न मिळाल्यानंतर एजन्सीने त्यांना क्लीन चिट दिली आहे. त्याच वेळी ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांना अटक करण्यात आली होती. मात्र, काही महिन्यांनंतर अभिनेत्रीला जामीन मिळाला.

मित्र गणेश याची सीबीआय कार्यालयाबाहेर निषेध करण्याची धमकी

सिद्धार्थच्या अटकेनंतर सुशांतचा मित्र गणेश म्हणाला की, त्याच्या अटकेमुळे हे प्रकरण केवळ ड्रग्सच्या अँगलमध्ये अडकवले जाईल. सिद्धार्थ सुशांतचा फ्लॅटमेट होता, म्हणून सीबीआयने देखील त्याच्यावर कारवाई करावी. सीबीआयनेही देखील त्याची लवकरात लवकर चौकशी केली पाहिजे, असे गणेश म्हणाला. तो पुढे म्हणाला की, 14 जूनपर्यंत सीबीआयकडून प्रतिसाद न मिळाल्यास ते दिल्लीस्थित सीबीआय कार्यालयाबाहेर निषेध नोंदवण्यास सुरुवात करेल.

(Sushant Singh Rajput Case NCB Summons actor ex servant neeraj and keshav)

हेही वाचा :

‘5G’ तंत्रज्ञानाविरोधात अभिनेत्री जुही चावलाने दाखल केली केस, न्यायालयात सुनावणी सुरु!

वडिलांच्या मृत्यूला रुग्णालयच जबाबदार, अभिनेत्री संभावना सेठकडून रुग्णालयाविरोधात कायदेशीर कारवाई!

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.