सुशांत सिंह राजपूत याच्या घरावर आता आहे अदा शर्मा हिचा हक्क? मोठी अपडेट समोर

Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर ज्या घराकडे कोणी वळूनही पाहत नव्हतं, ते घर आता 'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्मा हिच्या नावावर? सत्य अखेर समोर... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अदा शर्मा हिच्या घराची चर्चा...

सुशांत सिंह राजपूत याच्या घरावर आता आहे अदा शर्मा हिचा हक्क? मोठी अपडेट समोर
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 8:20 AM

मुंबई | 26 नोव्हेंबर 2023 : ‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा हिला आता कोणत्याही ओळखीची गरज नाही. सिनेमात दमदार भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या घराबाहेर स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा पासून अदा, सुशांत याचं घर खरेदी करेल अशा चर्चा रंगत होत्या… आता यावर खुद्द अदा शर्मा हिने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘माझं घर माझ्यासाठी मंदीर आहे…’ असं अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अदा शर्मा हिच्या वक्तव्याची चर्चा रंगलेली आहे.

घराबद्दल अदा शर्मा हिचं मोठं वक्तव्य

sushant singh rajputअदा म्हणाली, ‘माझं घर माझ्यासाठी मंदीर आहे. मी कुठे राहते याबद्दल वृत्तपत्र, मोबाईलमध्ये व्हायरल व्हावं असं मला वाटत नाही. मी लहानपणापासून पाली याठिकाणी माझ्या वडिलांच्या घरी राहत आहे. मी दुसऱ्या घरात राहायला जाणार जरी असेल, तरी देखील मी ही गोष्ट सर्वांना सांगणार नाही. योग्य वेळ आल्यानंतर मी सर्व काही शेअर करेल… तुम्ही ज्या ठिकाणी राहाता, ती तुमची खासगी जागा असते… लोकांच्या मनात राहणं… याकडे मी सध्या लक्ष केंद्रीत केलं आहे…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या खासगी आयुष्याबद्दल योग्य वेळ आली की मी चाहत्यांना सांगेल. माझ्याबद्दल ज्या चर्चा रंगत असतात, त्याचा मला काहीही फरक पडत नाही. अफवा म्हणजे कलाकारांच्या आयुष्याचा भार आहे. आमचा आवडता रंग, पदार्थ… सर्वकाही चाहत्यांना माहिती असतं…’

हे सुद्धा वाचा

‘माझं आयुष्य मला खासगी ठेवायला आवडतं. मी काय करते कोणालाच माहिती नसतं. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा करत आहे.. हे देखील कोणाला माहिती नव्हतं. मला अनेक जण फोन करून विचारायचे शुटिंग कुठे सुरु आहे.. पण कोणालाच नाही सांगितलं. जेव्हा सिनेमा प्रदर्शित होतो, तेव्हा मी सांगते.’ असं देखील अदा शर्मा नुकताच झालेल्या मुलाखतीत म्हणाली.

अदा शर्मा हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री लवकरच ‘बस्तर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या खांद्यावर असून सिनेमा सत्य घटनेवर आधारलेला असणार आहे. आता ‘बस्तर’ सिनेमात अभिनेत्री कोणत्या भूमिकेत दिसेली… यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Non Stop LIVE Update
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.
सांगलीत ठाकरे गटाचा खेळ विशाल पाटील बिघडवणार? ठाकरेंचं वाढवलं टेन्शन
सांगलीत ठाकरे गटाचा खेळ विशाल पाटील बिघडवणार? ठाकरेंचं वाढवलं टेन्शन.
पवारांच्या विधानावर दादा म्हणाले, सुनेचे दिवस येतात, किती दिवस बाहेरचे
पवारांच्या विधानावर दादा म्हणाले, सुनेचे दिवस येतात, किती दिवस बाहेरचे.
राणांना मोदींच्या हवेवर अविश्वास?, त्या वक्तव्यावरून विरोधकांची टीका
राणांना मोदींच्या हवेवर अविश्वास?, त्या वक्तव्यावरून विरोधकांची टीका.
मुंबईत मनसे इंजिनवर लोकसभा लढणार? पाठिंब्यानंतर महायुतीची पुन्हा बोलणी
मुंबईत मनसे इंजिनवर लोकसभा लढणार? पाठिंब्यानंतर महायुतीची पुन्हा बोलणी.
कल्याणात युतीधर्म संकटात? भाजप आमदाराची पत्नी ठाकरेंच्या उमेदवारासोबत?
कल्याणात युतीधर्म संकटात? भाजप आमदाराची पत्नी ठाकरेंच्या उमेदवारासोबत?.
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.