AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aditya Narayan | आदित्य नारायणला आजचा दिवस खूपच खास, वडिलांच्या वाढदिवशी लेक बोहल्यावर चढणार!

प्रसिद्ध गायक आदित्य नारायण आज 1 डिसेंबर रोजी आपली प्रेयसी श्वेतासोबत लग्न बंधनात अडकणार आहे. आजचा दिवसही खास आहे. कारण आज आदित्य नारायणचे वडील उदित नारायण यांचा वाढदिवस आहे.

Aditya Narayan | आदित्य नारायणला आजचा दिवस खूपच खास, वडिलांच्या वाढदिवशी लेक बोहल्यावर चढणार!
| Updated on: Dec 01, 2020 | 4:37 PM
Share

मुंबई : प्रसिद्ध गायक आदित्य नारायण आज 1 डिसेंबर रोजी आपली प्रेयसी श्वेतासोबत लग्न बंधनात अडकणार आहे. आजचा दिवसही खास आहे. कारण आज आदित्य नारायणचे वडील उदित नारायण यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे आदित्य नारायणसाठी हा दिवस अधिकच खास आहे.(Aditya naraya and shweta wedding ceremony)

कोरोनामुळे आदित्य आणि श्वेताचा लग्नाचे केवळ 50 लोकांनाच निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये पीएम मोदी, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, धर्मेन्द्र, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि माधुरी दीक्षित यांना निमंत्रण देण्यात आले आहे. आदित्य नारायणने विवाह सोहळ्याची काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यामध्ये आदित्य आणि श्वेता एकमेकांसोबत खूपच आनंदी दिसत होते.  लग्नानंतर रिसेप्शन 2 डिसेंबरला मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

एका मुलाखती दरम्यान आदित्यने आपल्या प्रेमाची कबुली देत, लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले होते. बोलताना आदित्य म्हणाला, ‘शापितच्या सेटवर माझी आणि श्वेताची भेट झाली होती. पहिल्याच भेटीत आमची छान मैत्री झाली होती. मात्र, काही काळाने मी तिच्यावर प्रेम करू लागलो, याची जाणीव मला झाली. मी तिला याबद्दल कल्पनादेखील दिली होती. मात्र, त्यावेळी आम्ही दोघेही करिअरमध्ये सेटल होण्याचा प्रयत्न करत असल्याने, प्रेमाऐवजी मैत्रीच्या नात्याला अधिक प्राधान्य दिले. एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ दिला ‘प्रत्येक नात्यात काहीना काही अडचणी असतात. याचा अर्थ असा नाही की, ते नाते नाते संपवले पाहिजे. आजकाल अशी लग्न फार कमी कालावधीत तुटतात. त्यामुळे आम्ही एकमेकांना जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ घेतला. 10 वर्ष एकमेकांसोबत घालवल्यावर, आता या नात्याला पुढे नेण्याचे आम्ही ठरवले आहे,’ असे म्हणत आदित्यने त्याच्या नातेसंबधातील भावनिक बंध उलगडला. काही महिन्यांपूर्वी आमच्यात भांडण झाल्याने, आम्ही वेगळे झालो, अशा अफवा पसरल्या होत्या. तेव्हा श्वेतासोबत बाहेर जाणेदेखील मुश्कील झाले होते, असे आदित्य म्हणाला. काही महिन्यांपूर्वी आदित्यचे नाव नेहा कक्करशी देखील जोडले गेले होते. मात्र, त्यांचे नाते केवळ शोमधील गमतीचा भाग होते. परंतु, या दोघांमध्ये छान मैत्रीचे नाते आहे.

संबंधित बातम्या :

Aditya Narayan | आदित्य आणि श्वेताच्या लग्नाचे सोहळे सुरू, फोटो शेअर करताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव!

Aditya Narayan | ठरलं! डिसेंबरमध्ये आदित्य बोहल्यावर चढणार, लग्नाच्या तयारीसाठी सोशल मीडियावरून ‘ब्रेक’!

(Aditya naraya and shweta wedding ceremony)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.