AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Srivastava health update: 35 दिवसानंतर राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट

राजूच्या कुटुंबीयांना डॉक्टरांवर पूर्ण विश्वास आहे , की ते त्याला लवकरच बरे करतील. राजू श्रीवास्तव यांचे कुटुंबीय, जवळचे मित्र आणि चाहते त्यांच्यासाठी सतत प्रार्थना करत आहेत

Raju Srivastava health update: 35 दिवसानंतर राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट
Raju Shrivastava
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Sep 16, 2022 | 10:48 AM
Share

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Comedian Raju Srivastava)यांच्या प्रकृतीबाबत(Health) दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. त्यांना रुग्णालयात   (Hospital) दाखल करून 35  दिवस झालेत. मात्र अद्यापही ते शुद्धीवर आलेले नाही. डॉक्टर सतत त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. राजू श्रीवास्तव यांचा मेंदू कार्यक्षम नाही, त्यामुळे ते शुद्धीवर येऊ शकले नाहीत. आणि ते शुद्धीवर येईपर्यंत काही सांगता येत डॉक्टरांना काही सांगता येत नाही.

राजूच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नाही

राजू श्रीवास्तव यांना शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नाही. त्यांच्यावर 35 दिवसांपासून उपचार सुरू आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या उपचारात कोणतीही कसर केली , आम्हाला त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली दिसून येत नाही.

 कुटुंबीय चिंतेत

राजूच्या कुटुंबीयांना डॉक्टरांवर पूर्ण विश्वास आहे , की ते त्याला लवकरच बरे करतील. राजू श्रीवास्तव यांचे कुटुंबीय, जवळचे मित्र आणि चाहते त्यांच्यासाठी सतत प्रार्थना करत आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या भावाने सांगितले की, 10 ऑगस्टपासून राजूला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . मात्र चिंताही वाढत आहे, तरीही त्यांचा डॉक्टरांवर पूर्ण विश्वास आहे. काहीतरी चमत्कार घडेल, सर्व व्यवस्थित होईल अशी आशा त्यांना आहे.

अलीकडेच राजूला संसर्ग झाला होता

वास्तविक, राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूशिवाय शरीराचे इतर सर्व अवयव पूर्णपणे ठीक आहेत. नुकताच त्यांना संसर्गामुळे ताप आला होता. डॉक्टर संसर्गाशी संबंधित शंका दूर करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्या जवळच्या लोकांनाही जाण्यापासून रोखण्यात आले. यासोबतच त्यांच्या व्हेंटिलेटरचा पाईपही बदलण्यात आला. 10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव जिममध्ये व्यायाम करताना पडले होते, त्यानंतर तेथील लोकांनी त्यांना उचलून रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल होताच त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Follow Us
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप