अरबाजच्या लग्नानंतर पहिल्यांदाच मलायकाचा घटस्फोटाबद्दल थेट खुलासा, म्हणाली, मला आतून..
Malaika Arora Divorce : मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. मलायका अरोरा ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे.

मुंबई : मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा ही आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते. मलायका अरोरा ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. लग्नाच्या तब्बल 19 वर्षांनंतर मलायका अरोरा हिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मलायका अरोरा हिने अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुन कपूर याला डेच करतंय.
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट होऊन आता बरीच वर्षे झाली आहेत. मात्र, मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटाचे कारण हे कधीच कळू शकले नाही. हेच नाही तर मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी देखील त्यांच्या घटस्फोटावर बोलणे कायचम टाळले. आता अरबाज खान हा त्याच्या आयुष्यात पुढे गेलाय.
काही दिवसांपूर्वीच अरबाज खान याने शूरा खान हिच्यासोबत लग्न केले. तर दुसरीकडे मलायका अरोरा देखील लवकरच अर्जुन कपूर याच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले जाते. पहिल्यांदाच आता इतक्या वर्षांनंतर मलायका अरोरा ही अरबाज खान याच्यासोबतच्या घटस्फोटाबद्दल बोलताना दिसली आहे. मलायकाने काही मोठे खुलासे केले आहेत.
मलायका अरोरा ही म्हणाली की, मी अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय हा व्यक्तीगत विकासासाठी घेतला आणि माझ्या आवडीसाठी घेतला. जर मला माझ्या मुलाला आनंदी ठेवायचे असेल आणि माझ्या मुलाला त्याच्या जागी वाढवायचे असेल तर मला आतून चांगले वाटले पाहिजे आणि मी तेच केले, असे थेट म्हणताना मलायका अरोरा ही दिसली आहे.
अखेर इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाचा अरबाज खान याच्यासोबतच्या घटस्फोटावर बोलताना मलायका अरोरा ही दिसली आहे. मलायका हिने स्पष्ट केले की, स्वत: च्या विकासासाठी तिने अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतला आहे. आता मलायका अरोरा हिच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. पहिल्यांदाच मलायका भाष्य करताना दिसली. आता याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
