Sunny Deol Next Movies: ‘बॉर्डर 2’नंतर सनी देओल यांचे 9 चित्रपट ओळीने येणार
Sunny Deol Upcoming Movies: 'बॉर्डर 2' ला बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाच्या यशामुळे युद्धाचे चित्रपट देखील यशस्वी होऊ शकतात हे 'बॉर्डर 2'या सिक्वलने सिद्ध केले आहे. आता सनी पाजीचे सलग 9 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

Sunny Deol Upcoming Movies: अभिनेता सनी देओल याचा ‘बॉर्डर 2’ सिनेमागृहात चांगला गल्ला खेचत आहे. चाहत्यांच्या अपेक्षेवर हा चित्रपट पूर्णपणे खरा उतरला आहे. या चित्रपटाने तिकीट खिडकीवर शंभर कोटींचा गल्ला जमा केला आहे. सनी देओल याचे लागोपाठ ओळीने चित्रपट येणार असून त्याच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच आहे.सनी देओल आता सिक्वेल चित्रपटांचे बादशहा ठरले आहेत. चला तर सनी देओल यांच्या आगामी चित्रपटांची यादी पाहूयात..
बॉर्डर 2 मुळे चर्चेत असलेल्या सनी देओल साल 2026 आणि 2027 ही गाजवण्याच्या तयारीत आहे. यातील काही चित्रपटांचे चित्रीकरण सुरु झाले आहे तर काही चित्रपटावर काम सुरु होणार आहे. तर काही रिलीजसाठी तयार आहेत. आज आपण सनी देओल याच्या 9 अपकमिंग चित्रपटांची माहीती घेऊयात. याती अर्ध्याहून अधिक सीक्वल येत आहेत. आणि सर्व चित्रपटाचे चाहते वाट पाहात आहेत.
‘गबरू’ आणि ‘अपने 2’
सनी देओल देओल याने 19 ऑक्टोबर 2025 रोजी त्याच्या वाढदिवसाला नवा चित्रपट ‘गबरु’ ची घोषणा केली होती. असे म्हटले जात आहे की हा चित्रपट 13 मार्च 2026 रोजी रिलीज होणार आहे. याचे दिग्दर्शन शशांक उदापुरकर यांनी केले आहे. तर ‘अपने 2’ हा सिक्वल देखील येत आहे. धर्मेंद्र यांच्या मृत्यूनंतर या चित्रपटाच्या कहाणीत बदल केला जात आहे.
‘रामायण’ आणि ‘रामायण पार्ट 2’
रणबीर कपूर आणि सई पल्लवी यांचा बहुचर्चित ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागात तयार होत आहे. पहिला भाग दिवाळी 2026 वर रिलीज होणार आहे. तर दुसरा भाग साल 2027 मध्ये दिवाळीतच रिलीज होणार आहे. दोन्ही चित्रपटांचे एकूण बजेट 4 चार हजार कोटी रुपये आहे. रामायणात सनी देओल हनुमानजीची भूमिका करणार आहेत.
‘बॉर्डर 3’ आणि ‘गदर 3’
बॉर्डर – 2 च्या मोठ्या यशानंतर चित्रपट दिग्दर्शक भूषण कुमार यांनी ‘बॉर्डर 3 देखील कन्फर्म केला आहे. हा चित्रपट येण्यासाठी बराच काळ लागणार आहे. तर ‘गदर 3’ वरही बरेच काळापासून चर्चा सुरु आहे. अलिकडेच सोशल मीडियावर अमीषा पटेल हीने एका चाहत्याला उत्तर देताना सांगितले की यावेळी चित्रपटाची कक्षा, कंटेन्ट आणि बजेट देखील मोठे असणार असल्याचे म्हटले आहे.
‘जाट 2’, ‘लाहौर 1947’ आणि ‘माँ तुझे सलाम 2’
साल 2025 मध्ये सनी देओल याचा ‘जाट’चित्रपट आला होता. हा चित्रपट फारसा चर्चेत नसला तरी याचा सिक्वल करण्याची घोषणा झाली होत.हा ‘जाट 2’ साल 2026 मध्ये रिलीज होऊ शकतो. सनी देओल याच्याकडे ‘लाहौर 1974’नावाचा एक चित्रपट देखील पाईपलाईनमध्ये आहे. या चित्रपटाचा निर्माता आमीर खान आहे. तसेच ‘गदर 2’च्या यशानंतर माँ तुझे सलाम च्या सिक्वेलची घोषणा झाली होती. माँ तुझे सलाम साल 2002 रोजी रिलीज झालाा होता.
