Takatak 2 : प्रेक्षकांच्या ‘टकाटक’ प्रतिसादानंतर आता ‘टकाटक-2’ येतोय

Takatak 2 : प्रेक्षकांच्या ‘टकाटक’ प्रतिसादानंतर आता  ‘टकाटक-2’ येतोय

बॉक्स ऑफिसवर तूफान गाजलेला आणि प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केलेला ‘टकाटक’ हा मराठी चित्रपट आता सिक्वेलच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (After the ‘Takatak’ response from the audience, now ‘Takatak-2’ is coming)

VN

|

Apr 09, 2021 | 2:37 PM

मुंबई : बॉक्स ऑफिसवर तूफान गाजलेला आणि प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केलेला ‘टकाटक’ (Takatak) हा मराठी चित्रपट आता सिक्वेलच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘टकाटक’ने विक्रमी व्यवसाय करत 2019 च्या पूर्वार्धाच्या अखेरीस मराठी सिनेसृष्टीत नवचैतन्य निर्माण केलं होतं. लॉकडॉऊनच्या पार्श्वभूमीवर आता ‘टकाटक 2’ (Takatak 2) ची घोषणा करण्यात आल्याने सिनेसृष्टीत पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. (After the ‘Takatak’ response from the audience, now ‘Takatak-2’ is coming)

सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘टकाटक 2’चं मोशन पोस्टर लाँच

पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम तसेच सहनिर्माते जगत सिंग यांनी ‘टकाटक 2’ची अधिकृत घोषणा केली आहे. याप्रसंगी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘टकाटक 2’चं मोशन पोस्टर लाँच करण्यात आलं. ‘टकाटक’ची कथा तरुणाईवर आधारित होती. यासोबतच या चित्रपटात एक सशक्य मेसेजही दडला होता, त्यामुळे ‘टकाटक 2’ या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनीच ‘टकाटक 2’ची कथा आणि पटकथा लिहिली असून संवाद किरण बेरड यांचे आहेत. गीतकार जय अत्रे यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना संगीतकार वरूण लिखते संगीतबद्ध करणार असून हजरत शेख वली या चित्रपटाचे कॅमेरामन आहेत. ‘टकाटक 2’मधील कलाकारांची नावे सध्या तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत.

‘टकाटक 2’मध्ये प्रेक्षकांना एक फ्रेश प्रेमकथा पहायला मिळणार

‘टकाटक’ या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्याने ‘टकाटक 2’च्या रुपात पुढील भाग आणण्याची कल्पना सुचल्याचं दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी सांगितलं. ‘टकाटक 2’मध्ये प्रेक्षकांना सुमधूर गीत-संगीताने सजलेली एक फ्रेश प्रेमकथा पहायला मिळणार आहे. ‘टकाटक’ला मिळालेल्या यशानंतर पुढील भाग बनवताना जबाबदारी आणखी वाढली आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांना रुचेल, पटेल आणि भावेल असं काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, जो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी खात्री मिलिंद कवडे यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

Photo : ‘जया भादुरी ते जया बच्चन’; फिल्मी दुनियेतील गुड्डीच्या आयुष्यातील खासमखास गोष्टी

Photo : ‘हॅप्पी बर्थ डे…’ वाद विवाद आणि स्वरा भास्कर, जाणून घ्या काही खास गोष्टी

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें