थिएटरमध्ये ‘छावा’ संपल्यावर स्क्रिनसमोर तरूणीची शिवगर्जना; तरीही नेटकऱ्यांनी का केलं तिला ट्रोल?
चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांना अश्रू अनावर होतात. छावा चित्रपटाने सर्वच प्रेक्षक हे भारावून जात आहेत तर. काही जणांनी तर चित्रपटगृहातच शिवगर्जना करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. असाच एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. थिएटरमध्ये चित्रपट पाहिल्यानंतर एका तरुणीने केलेली जोरदार शिवगर्जना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा ‘छावा’चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाला आणि सर्व थिएटर हाऊसफुल झाले. चित्रपटाने धुमाकूळ घातला. प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. विकी कौशलपासून ते चित्रपटातील सर्व कलाकारांचं कौतुक होत आहे. विकीने संभाजी महाराजांची साकारलेली भूमिका पाहून सर्वांनीच त्याचं कौतुक केलं आहे.
थिएटरमध्ये शिवगर्जना होतानाचे व्हिडीओ व्हायरल
दरम्यान प्रेक्षक ज्या उत्साहात चित्रपटगृहात संभाजी महाराजांचा हा चित्रपट पाहायला जातायत त्यापेक्षा दुप्पट एनर्जीने आणि महाराजांच्या शौऱ्याची गाथा आपल्या मानवर रुजवून येतायत. चित्रपटातील सर्वच सीन हे अंगावर येणारे आहेत. चित्रपट पाहाताना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या जयघोष थिएटरमध्ये होताना दिसत आहे. असे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
थिएटरमधील तरुणीचा व्हिडीओ व्हायरल
चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण आपल्या भावनांना आवर घालू शकले नाहीत आणि त्यांचे अश्रू अनावर झाले. काही जणांनी तर चित्रपटगृहातच शिवगर्जना करून आपल्या भावना व्यक्त केल्या. असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे ज्यात एक तरुणी चित्रपट पाहिल्यानंतर जोरदार शिवगर्जना करताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काही नेटकऱ्यांनी या मुलीचं कौतुक केलंय.
स्क्रिनसमोर उभी राहिली अन् शिवगर्जना…
छावा चित्रपट संपल्यानंतर ही तरुणी चित्रपटगृहात स्क्रिनसमोर उभी राहिली अन् शिवगर्जना करू लागली. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे ती प्रचंड एनर्जीने ती शिवगर्जना करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पण यावर काही नेटकऱ्यांनी तिने हे सगळं फॉलोवर्ससाठी केल्याचं म्हटलं आहे.
नेटकऱ्यांनी तरुणीची उडवली खिल्ली
एका युजरने कमेंट करत लिहिले आहे की, “तिचे फॉलोवर्स बघा किती आहेत. याला शिवभक्ती नाही तर रील शूट म्हणता येईल.” तर दुसऱ्याने लिहिलं आहे, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली व्यक्त होऊ द्या तरुणांना! उगाच काड्या करणे बंद करा, कारायच्याच असतील तर योग्य ठिकाणी करा”, तर काही जणांनी या कृतीवर आक्षेप घेतला आहे. अशापद्धतीच्या कमेंट्स करत या तरुणीने हे सगळं फक्त प्रसिद्धीसाठी केल्याचं म्हटलं आहे.