AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aggabai Sunbai | प्रेक्षकांना येतेय जुन्या ‘शुभ्रा’ची आठवण, ‘या’ कारणामुळे तेजश्रीने मालिकेला म्हटला गुडबाय!

‘अग्गबाई सुनबाई’ ही मालिका सध्या चर्चेत आहे. याआधी ‘आग्गबाई सासूबाई’ या मालिकेने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. त्याजागी आलेली ही नवीन मालिका तशीच असेल की, यात आणखी काही वेगळं दाखवलं जाईल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Aggabai Sunbai | प्रेक्षकांना येतेय जुन्या ‘शुभ्रा’ची आठवण, ‘या’ कारणामुळे तेजश्रीने मालिकेला म्हटला गुडबाय!
तेजश्री प्रधान आणि उमा पेंढारकर
| Updated on: Mar 29, 2021 | 1:36 PM
Share

मुंबई : झी मराठीवरील ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. मात्र, आता या मालिकेचा सिक्वेल अर्थात जुन्या मालिकेऐवजी ‘अग्गबाई सूनबाई’ (Aggabai Sunbai) ही नवी मालिका सुरु झाली आहे. ‘अग्गबाई सूनबाई’ या मालिकेत ‘शुभ्रा’च्या भूमिकेत काहींसाठी परिचयाचा, तर काहींसाठी नवखा वाटणारा ‘उमा पेंढारकर’ हा चेहेरा दिसतो आहे. मात्र, प्रेक्षक अजूनही जुन्या ‘शुभ्रा’ला अर्थात अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) हिला मिस करत आहेत (Aggabai Sunbai Serial Why Shubhra Aka Actress Tejashri Pradhan reject new shubhra).

‘अग्गबाई सुनबाई’ ही मालिका सध्या चर्चेत आहे. याआधी ‘आग्गबाई सासूबाई’ या मालिकेने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. त्याजागी आलेली ही नवीन मालिका तशीच असेल की, यात आणखी काही वेगळं दाखवलं जाईल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. या मालिकेतील ‘शुभ्रा’, ‘बबड्या’, ‘आसावरी’ आणि ‘अभिजित राजे’ ही पात्र अतिशय प्रसिद्ध झाली आहेत.

उमा पेंढारकर साकारतेय ‘शुभ्रा’

या नवीन आलेल्या ‘आग्गबाई सुनबाई’ मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी बऱ्याच वेगळ्यावेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. प्रोमोमध्येच प्रेक्षकांना समजले होते की, या मालिकेतील शुभ्राची भूमिका ही अभिनेत्री तेजश्री प्रधान साकारणार नसून, तिच्याजागी आपल्याला एक वेगळी अभिनेत्री ‘शुभ्रा’ म्हणून दिसणार आहे. हे पात्र सध्या प्रसिद्ध अभिनेत्री उमा पेंढारकर साकारत आहे.

… म्हणून सोडली मालिका!

परंतु, अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला या मालिकेतून एवढी प्रसिद्धी मिळत असूनही, तिने ही मालिका का सोडली असावी?, अशी शंका चाहत्यांच्या मनात आहे. शेवटी सगळ्यांना आयुष्यात पुढे जायचे असते, वेगळी वेगळी ध्येय पूर्ण करायची असतात. तसेच काहीसे तेजश्री बरोबर झाले आहे. तेजश्री आता लवकरच बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अभिनेता शर्मन जोशी सोबतचा तिचा ‘बबलू बॅचलर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे (Aggabai Sunbai Serial Why Shubhra Aka Actress Tejashri Pradhan reject new shubhra).

लवकरच झळकणार बॉलिवूडमध्ये!

हा चित्रपट 2020मध्येच रिलीज होणार होता, परंतु कोरोना महामारीमुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे यावर्षी त्यांचा ‘बबलू बॅचलर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तेजश्री या चित्रपटाच्या कामात व्यस्त असल्याने तिने ‘अग्गबाई सुनबाई’ ही मालिका सोडल्याचे सांगण्यात येत आहे. तेव्हा आता प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री लवकरच चित्रपटांमधून आपल्या भेटीस येणार आहे.

अद्वैत साकारतोय ‘बबड्या’!

‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेतील सर्वात महत्त्वाचं पात्र ‘बबड्या’ अर्थात ‘सोहम कुलकर्णी’ हे प्रचंड गाजलं होतं. या भूमिकेत असणारा अभिनेता आशुतोष पत्कीला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. आता या मालिकेचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, यातील दोन मुख्य पात्र ‘शुभ्रा आणि सोहम’ यांना रिप्लेस करण्यात आलं आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने गाजवलेली शुभ्राची भूमिका आता अभिनेत्री उमा ऋषिकेश पेंढारकर साकारत आहे. तर, आशुतोषची ‘बबड्या’ ही भूमिका अभिनेता अद्वैत दादरकर सकारात आहे. ‘बबड्या’च्या भूमिकेसाठी अभिजीत खांडकेकरचे नावं देखील पुढे येत होते. मात्र, नंतर अद्वैतच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि त्याने चित्रीकरणाला सुरुवात केली.

(Aggabai Sunbai Serial Why Shubhra Aka Actress Tejashri Pradhan reject new shubhra)

हेही वाचा :

Holi 2021 | मालिकांमध्ये होळीच्या सणाची धमाल, पाहायला मिळणार नात्यांचे बदलते रंग!

Holi 2021 | मराठी कलाकारांवरही चढलाय होळीचा रंग, ‘या’ जोड्या साजरी करणार लग्नानंतरची पहिली होळी!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.