अहमदाबाद अपघातानंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या विमानातून प्रवास; शेअर केली विमानातील सध्याची परिस्थिती
अहमदाबाद अपघाताच्या काहीच दिवसांनी अभिनेत्री रवीना टंडनने एअर इंडियाच्या विमानातून प्रवास केला आहे. तिने विमानातील फोटो शेअर करत विमानातील सध्याची परिस्थिती दाखवून दिली आहे.

अहमदाबादमधील विमान अपघातातून देश अद्याप सावरलेला नाही. अहमदाबादहून लंडनला प्रवाशांना घेऊन जाणारे विमान टेकऑफच्या एका मिनिटातच कोसळले. फक्त एक प्रवासी वाचला. इतर सर्व 241 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये प्रवाशांसह क्रू मेंबर्सचाही समावेश आहे. विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातानंतर लोक विमानाच्या नावाची भीती बाळगू लागले आहेत आणि विमानाने प्रवास करण्यापासून टाळू लागले.
अपघाताच्या काही दिवसानंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या विमानाने प्रवास
जगभरातील लोकांनी आणि सेलिब्रिटींनी या भयानक अपघातावर शोक व्यक्त केला. बॉलिवूडनेही पीडित कुटुंबांबद्दल शोक व्यक्त केला. आता, अपघाताच्या काहीच दिवसानंतर रवीना टंडन एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करतानाचे फोटो समोर आले आहे. अपघातग्रस्त विमान देखील एअर इंडियाचेच होते हे सर्वांमा माहित आहे. जेव्हा रवीना प्रवासासाठी विमानात गेली तेव्हा तिला धक्का बसला. तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवर पाहिलेल्या दृश्याची संपूर्ण कहाणी सांगितली आहे.
रवीनाने विमानाच्या आतील फोटो शेअर केले
रवीना टंडनने सोमवार 16 जून रोजी तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून तिचे अनेक फोटो शेअर केले. ती एअर इंडियाच्या विमानात बसलेली दिसतेय. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने तिचे तिकीटही शेअर केले आहे. अहमदाबाद अपघातानंतर काही दिवसांनी एअर इंडियाच्या विमानांमध्ये आता कसे वातावरण आहे हे तिने सांगितले आहे. रवीनाने कॅप्शनमध्ये लिहिले, “नवीन सुरुवात, सर्व अडथळ्यांना न जुमानता पुन्हा उड्डाण करणे आणि अधिक मजबूत होणे. प्रवाशांच्या शांततेत आणि क्रूच्या हास्यात दुःख लपलेले दिसत होते. प्रवासी आणि क्रूमध्ये शांत भावना दिसून येत होत्या.”
रवीनाने पुढे म्हटलं “ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या कुटुंबियांना संवेदना. कधीही न भरणारी ती जखम आहे. एअर इंडिया देव नेहमी तुमची मदत करो. पुन्हा निर्भय आणि मजबूत होण्यास तयार आहे. जय हिंद.”
View this post on Instagram
12 जून रोजी घडला अपघात
अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान 242 जणांना घेऊन 12 जून रोजी दुपारी उड्डाणानंतर अहमदाबादमध्ये कोसळले. अपघातातील मृतांच्या मृतदेहांची डीएनए नमुन्यांद्वारे ओळख पटवली जात आहे.
