गर्द झाडी, वाहतं पाणी अन्…मराठी सेलेब्रिटी जोडप्याचा निर्सगराजासह सुंदर डान्स
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी आपल्या नृत्याच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. त्यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. चाहत्यांना त्यांच्या व्हिडीओमध्ये त्यांच्या डान्सपेक्षाही त्यांच्या मागे असणारा देखणा नजारा आवडला.

बॉलिवूडमधील काही कपल त्यांच्या सोशल मीडियावर रील, व्हिडीओमुळे कायम चर्चेत असतात. ज्यापैकी एक रितेश-जेनेलिया अग्रेसर आहेत. पण तुम्हाला माहितीये का की अशीच एक सेलिब्रिटी जोडी मराठी इंडस्ट्रीतही आहे.
ही जोडी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. शिवाय यांचे रील आणि व्हिडीओ म्हणजे भलतेच प्रसिद्ध आणि व्हायरल होणारे असतात. या जोडीचे डान्सचे रील सर्वात जास्त चर्चेत असतात.
ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा डान्स व्हिडीओ पुन्हा चर्चेत
ही मराठी सेलिब्रिटी जोडी आहे ऐश्वर्या आणि अविनाश नारकर. हे दोघेही नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते त्याच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
सोशल मीडियाद्वारे ते नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असतात. अशातच त्यांचा एक नवीन व्हिडिओ संमोर आला आहे. या व्हिडिओमधील त्यांचा डान्सही पुन्हा चर्चेचा विषय ठरतोय.
डोळ्यांचं पारणं फेडणारं निसर्गांचं रुप
मुख्य म्हणजे ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या डान्ससोबतच त्यांच्या आजुबाजूला असलेला परिसर, देखणा नजाऱ्याच्या प्रेमात चाहते पडले आहे. निसर्गरम्य वातावरणात या जोडीने डान्स केला आहे. मागे संथ वाहणारं पाणी, दाट झाडी आणि डोळ्याचं पारणं फेडणारं निसर्गांच हे रुप दिसत आहे.
View this post on Instagram
ऐश्वर्या नारकरांचे हावभाव लक्ष वेधतात
या व्हिडीओमध्ये या जोडीसोबत अश्विनी कासारसह डान्स करताना दिसत आहेत. चाहत्यांनी त्यांच्या डान्सला पसंती दर्शवत कौतुक केलं आहे. ‘कौन दिसा मै’ या गाण्यावर या कलाकारांनी ताल धरला आहे. डान्समधील ऐश्वर्या नारकरांचे हावभाव लक्ष वेधून घेतात.
चाहत्यांचे व्हिडिओला भरभरुन प्रेम
डान्स करताना त्यांच्या पाठीमागे वाहतं पाणी आहे. तर आजूबाजूला गर्द झाडी आहे. ऐश्वर्या नारकरांनी हा व्हिडिओ शेअर केला असून चाहत्यानाही हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. चाहत्यांनी त्यांच्या व्हिडिओला भरभरुन प्रेम दिलं आहे.
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर डान्सच्या व्हिडिओमुळे नेहमीच चर्चेत असतात. अशातच त्याच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दाखवली आहे. ऐश्वर्या नारकर यांनी ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही भूमिकांमध्ये प्रेक्षकांचं मने जिंकली. त्यामुळे आता त्या कोणत्या नवीन भूमिकेत पहायला मिळणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
