‘घटस्फोटाच्या चर्चांना आता…’, लग्नाच्या 17 वर्षांनंतर ऐश्वर्या राय हिने पोस्ट केलाय असा फोटो

Aishwarya Rai - Abhishek Bachchan | ऐश्वर्या राय हिच्या एका पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष, अभिषेक याची पोस्ट पाहून चाहते हैराण, सध्या सर्वत्र बच्चन कुटुंबाची चर्चा... गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे ऐश्वर्य - अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा... अखेर दोघांच्या पोस्टमुळे समोर आलं सत्य...

'घटस्फोटाच्या चर्चांना आता...', लग्नाच्या 17 वर्षांनंतर ऐश्वर्या राय हिने पोस्ट केलाय असा फोटो
Follow us
| Updated on: Apr 21, 2024 | 8:12 AM

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. पण लग्नाच्या 17 वर्षांनंतर ऐश्वर्या – अभिषेक यांनी केलेल्या पोस्टमुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. ऐश्वर्या – अभिषेक यांना लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत आनंदी पाहून चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला. लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाल्यामुळे ऐश्वर्या – अभिषेक दोघांनी देखील इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या – अभिषेक यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

ऐश्वर्या – अभिषेक यांनी सोशल मीडियावर आराध्या हिच्यासोबत फोटो पोस्ट करत लग्नाच्या वाढदिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. जवळपास 8 तासांपूर्वी ऐश्वर्या – अभिषेक यांनी फोटो पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या – अभिषेक यांची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

ऐश्वर्या – अभिषेक यांच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत आनंद व्यक्त करत आहेत. फक्त चाहते नाही तर, सेलिब्रिटींनी देखील दोघांच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. ईशा देओल, बॉबी देओल, रितेश देशमुख, अंकुर भाटिया, डब्बू मलिक, इनायत वर्मा, रणविजय सिंघा, लिजेस डिसूजा यांनी देखील ऐश्वर्या – अभिषेक यांना लग्नाच्या 17 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम

ऐश्वर्या – अभिषेक यांचा आराध्या हिच्यासोबत फोटो पाहिल्यानंतर दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘आता घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘तुम्हाला पुन्हा एकदा पाहिल्यानंतर आनंद झाला आहे.’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘बॉलिवूडमधील बेस्ट कुटुंब…’

आराध्या हिच्या लूकने वेधलं सर्वांचं लक्ष

ऐश्वर्या – अभिषेक यांच्यासोबत असलेल्या आराध्या हिचा नवा लूक पाहून चाहते देखील थक्क झाले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘आराध्या सुंदर दिसत आहे…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तिघांना एकत्र पाहून आनंद वाटत आहे…’, ‘आराध्या पूर्णपणे तिच्या वडिलांसारखी दिसते…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘आराध्या तुमच्या दोघांच्या पाऊलावर पाऊल ठेवत यशाच्या शिखरावर पोहोचेल…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या – अभिषेक यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.