ऐश्वर्या रायने विवाहित महिलांना दिला असा सल्ला; वाचून ट्रोलर्सचं तोंड होईल बंद!

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चनशी लग्न केलं असून गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या घटस्फोटाच्या सतत चर्चा आहेत. अशातच ऐश्वर्याने विवाहित महिलांना दिलेला सल्ला व्हायरल होत आहे.

ऐश्वर्या रायने विवाहित महिलांना दिला असा सल्ला; वाचून ट्रोलर्सचं तोंड होईल बंद!
ऐश्वर्या राय
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 21, 2026 | 6:22 PM

गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत आहेत. या चर्चांवर अभिषेकने जवळपास वर्षभरानंतर मौन सोडत “माझ्या बायकोला माझं सत्य माहीत आहे आणि मला तिचं सत्य माहीत आहे. आमचं कुटुंब आनंदी आहे,” असं सडेतोड उत्तर दिलं होतं. त्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक विविध कार्यक्रमांमध्ये एकत्रसुद्धा दिसले होते. आता या दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या वैवाहिक आयुष्याबद्दल मोकळेपणे बोलताना दिसत आहेत. हा व्हिडीओ 2007 मधील ‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या चॅट शोमधील आहे.

या चॅटशोमध्ये अभिषेकने खुलासा केला होता की, “जेव्हा कधी त्यांचं भांडण व्हायचं, तेव्हा तोच बोलायला जायचा. विवाहित पुरुष ही गोष्ट समजू शकतात की हे किती खरं आहे? कोणतीच पत्नी कधीच आधी माफी मागत नाही. प्रत्येक लग्नात पत्नीच नेहमी बरोबर असते.” अभिषेकच्या या वक्तव्यावर करण जोहर हसतो, पण त्यानंतर ऐश्वर्या जे उत्तर देते, ते ऐकून तोसुद्धा गप्प होतो. “गप्प राहणं हीच विवाहित महिलेची सर्वांत मोठी ताकद आहे. हा जिद्दीचा प्रश्न नाही, ही प्रेमाला योग्य मार्ग दाखवण्याची गोष्ट आहे”, असं ऐश्वर्या म्हणते.

ऐश्वर्या आणि अभिषेकने 2007 मध्ये लग्न केलं. तर 2011 मध्ये ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला. गेल्या काही महिन्यांपासून सतत या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. त्यातच अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांच्या लग्नात ऐश्वर्या आणि अभिषेक वेगवेगळे पोहोचले, यामुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली. घटस्फोटाच्या चर्चांवर दोघांनीही आदरपूर्वक मौन बाळगलं होतं. परंतु डिसेंबर 2025 मध्ये दिलेल्या मुलाखतीत अभिषेक पहिल्यांदाच त्यावर मोकळेपणे व्यक्त झाला.

स्वत: इंडस्ट्रीत काम करत असल्यामुळे आणि पत्नीसुद्धा अभिनेत्री असल्यामुळे अशा अफवांना कसं सामोरं जायचं हे माहीत असल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं. “फिल्म इंडस्ट्रीत लहानाचं मोठं झाल्याचा आणि फिल्म इंडस्ट्रीत काम करणारी पत्नी असल्याचा हा एक फायदा असतो. माझ्या मनात मीडियाविषयी फार आदर आहे, परंतु अनेकदा त्यांनी दिलेलं वृत्त हे चुकीचं असतं. मीडिया हा देशाचा विवेक आहे. आजच्या वेगवान काळात सर्वांत आधी बातमी ब्रेक करण्याची घाई सर्वांना असते आणि त्यामागचा दबाव मी समजू शकतो. पण तुम्ही कशासाठी इथे आहात”, असा सवाल त्याने केला होता.