लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंध ठेवणे योग्य? ऐश्वर्या रायने स्पष्टच सांगितलं, व्हिडीओ व्हायरल
ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवांमध्येच ऐश्वर्याची एक जुनी मुलाखत व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत ऐश्वर्याने पाश्चात्य संस्कृती आणि विवाहापूर्वीच्या शारीरिक संबंधांबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. तिच्या या मतांमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत राहिलेलं कपल म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या. यांच्या घटस्फोटाच्या चर्चा असोत की बच्चन कुटुंबातील वादाच्या अफवा असो. वाऱ्यासारख्या पसरणाऱ्या या बातम्यांमधून दरवेळी नवीन संदर्भ समोर येत होते. एवढच नाही तर ऐश्वर्याने आपल्या नावातून ‘बच्चन’ आडनाव काढून टाकल्यानंतर या अफवांना आणखीनच जोर चढला होता. इतकेच नाही तर, अभिषेक बच्चनसोबत अभिनेत्री निम्रत कौरचे नावही जोडले जाऊ लागले होते.
ऐश्वर्या अभिषेकचे जुने मुलाखतींचे व्हिडीओ व्हायरल
ऐश्वर्या आता आपली मुलगी आराध्यासोबत बच्चन कुटुंबापासून वेगळी राहत असल्याची माहितीही समोर आली होती. मात्र याबद्दल या दोघांनीही कधीच उघडपणे काहीही भाष्य केले नव्हते. अखेर, या सर्व अफवांना पूर्णविराम देत या दोघांनी एकत्र येत या अफवा खोट्या असल्याचे सिद्ध केले.पण याचदरम्यान ऐश्वर्या अभिषेकचे जुने मुलाखतींचे, कार्यक्रमांचे व्हिडीओ व्हायरल झाले. त्या व्हिडीओवरूनही दोघांच्या नात्यांचे संदर्भ लावले जात होते.
पाश्चिमात्य संस्कृतीबद्दलच्या मतांबद्दलचा ऐश्वर्याचा जुना व्हिडीओ
अशाच एक ऐश्वर्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या एका मुलाखतीतील हा व्हिडीओ असून त्यामध्ये अनेक गोष्टींबद्दल तिने तिचे मत मांडले होते. एका मुलाखतीत तिने पाश्चिमात्य संस्कृतीबद्दल काही मते मांडली होती. तोच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
“भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने हे थोडे विचित्र वाटू शकते…”
या व्हिडिओमध्ये, ऐश्वर्याला भारतातील प्रेमी युगुलांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, काही कपल सार्वजनिक ठिकाणी किस करताना दिसतात ही पाश्चिमात्य संस्कृती आता आपल्या इथेपण जास्त बळावत चाललीये तर याबद्द तिला मत विाचरण्यात आलं होतं, तेव्हा ऐश्वर्याने म्हटलं होतं की, “भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने हे थोडे विचित्र वाटतं. परंतु, चित्रपटांमध्ये ते कधीकधी स्वीकारलं जातं. पण नक्कीच सार्वजनिक ठिकाणी हे थोडं चुकीचं वाटू शकतं.”
लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंध ठेवण्याबाबत ऐश्वर्या स्पष्टच बोलली
त्यानंतर ऐश्वर्याला लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंध ठेवण्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ऐश्वर्या म्हणाली की, “पाश्चिमात्य संस्कृतीत याबद्दल थोडं वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं पण आपल्या इथे हा थोडा वादग्रस्त मुद्दा असू शकतो”. ऐश्वर्याने ही मुलाखत दिली होती तेव्हा तिचे आणि अभिषेकचे लग्न झालेले नव्हते. अभिनेत्रीचा 2005 मधील हा मुलाखतीचा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.